Border Dispute कर्नाटक राज्याच्या दादागिरीविरोधात पवई येथील कर्नाटक बॅंकेच्या बाहेर राष्ट्रवादीकडून आंदोलन

Border Dispute कर्नाटक राज्याच्या दादागिरीविरोधात पवई येथील कर्नाटक बॅंकेच्या बाहेर राष्ट्रवादीकडून आंदोलन

बेळगावमधील (Belgaum) हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर (toll booth) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांवर (vehicles) हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. बेळगावात महाराष्ट्राच्या १० वाहनावर हल्ला करण्यात आलाय. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर या भागात कर्नाटक राज्याचा तीव्र निषेद करण्यात आला. राज्यातील बड्या नेत्यांनी कन्नड रक्षण वेदिका या संघटनेनं केलेल्या कृत्याचा जाहीर शब्दात निषेद केला आहे. ही मारहाण थांबवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४८ तासांचा कालावधी दिला आहे.

यासंपूर्ण पार्शवभूमीवर मुंबईतील पवई याठिकाणी कर्नाटक राज्याविरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एमटीएनएल बिल्डिंग कम्पाऊंड, कर्नाटक बँकेचे मुख्य प्रवेशद्वार, पवई, मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे कार्याध्यक्ष नितीन हिंदूराव देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन होणार आहे. “आम्ही उद्या कर्नाटक बँकेच्या पवई येथील शाखेबाहेर अनोखे आंदोलन करणार आहोत. कन्नड वेदिगेच्या कार्यकर्त्यांनी आजही बेळगावमधील मराठी माणसांना मारहाण केली आहे, अशा बातम्या निदर्शनास आल्या. आता आम्ही उद्या कर्नाटक बँकेच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम घेणार आहोत. कर्नाटक बँकेवर मराठी माणसांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणार आहोत.” असे नितीन हिंदूराव देशमुख यांनी म्हटले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४ तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

हे ही वाचा : 

मलायका अरोराचा ड्रेस पाहून नेटकऱ्यानी केले ट्रॉल

राहुल द्रविड यांच्या जागेवर प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version