“भावांकडून बहिनींसाठी माहेरचं आंदण आहे.”- Eknath Shinde

“भावांकडून बहिनींसाठी माहेरचं आंदण आहे.”- Eknath Shinde

सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडीना वेग आला आहे. या निवडणुकीत आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असल्यामुळे प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान अनेक प्रलंबित असे प्रश्न हे प्रलंबितच राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरु आहे. या लाडक्या बहीण योजनेचा दुसरा टप्पा पार पडत आहे. यात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.

“आतापर्यन्त पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख रुपये पैसे जमा केले आणि आता दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ६ ० लाख टप्पा जाईल. आज खऱ्या अर्थाने लाडकी ब्बाहीन योजनेचा दुसरा टप्पा इथे नागपूर मध्ये आयोजित केला आहे. तिजोरीतले पैसे हे जनतेचेच आहेत. बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला समाधान मिळत. सरकार म्हून आम्ही काहीतरी केलं असं वाटत. जे बोलतो ते आम्ही करतो. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. विरोधक काहीही बोलू देत ही योजना कदापि बंद होणार नाही. बरी नजर वाले तेरा मुह कला. हे सरकार देणार आहे. घेणारं  नाही. भावांकडून बहिनींसाठी माहेरचं आंदण आहे. या पूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले आणि इतिहासात जमा झाले. सर्वसामान्यच्या पोटावर पाय का द्यायचा. पैशाच्या राशित लोळणारे त्यांना काय कळणार या पैशाची किंमत. दीड हजार रुपयांनी छोटासा हातभर आम्ही लावत आहोत. महिन्याचा खर्च हा बहिणींनाच माहिती आहे. ही योजना आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. नरेंद्र मोदींनी सुद्धा लखपती दीदी योजना सुरु केली. हा माझा विश्वास आहे. मुलगी शिकणारी असेल तर तिच्यासाठी हे सरकार संवेदनशील आहे.  सावत्र भावांपासून सावध राहा. गुन्हेगाराला माफी नाही तसेच चुकीलाही माफी नाही. ये तो बस ट्रेलर है पिच्चर अभी बाकी है… “

हे ही वाचा:

Exit mobile version