spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Budget Session 2024 : सभागृहात आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात हमरीतुमरी…

आज पहिल्या सत्रात विधिमंडळाच्या परिसरात शिंदे गटाचे (Shinde Group) दोन नेत्यांमध्ये वाद झ्याल्याचे चित्र दिसून आले तर दुसरीकडे सभागृहात आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले आहे.

राज्यात सध्या अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. दिनांक २६ फेब्रुवारी पासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चालू झाले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2024) आज शेवटचा दिवस. परंतु आजचा हा शेवटचा दिवस चांगलाच नाट्यमय झाल्याचे दिसून येत आहे. आज पहिल्या सत्रात विधिमंडळाच्या परिसरात शिंदे गटाचे (Shinde Group) दोन नेत्यांमध्ये वाद झ्याल्याचे चित्र दिसून आले तर दुसरीकडे सभागृहात आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आजच सभागृहात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सभागृहात बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सभागृह किती वेळ चाललं यावर प्रश्न उपस्थित केला. भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षांनी घसा कितीही फोडला, कितीही कंठशोष केला, तरी सरकारला त्याचं काही देणंघेणं नाही. कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे. भास्कर जाधवांच्या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार संतापले आणि त्यांनी विरोधकांवर थेट टीकास्त्र डागलं. आशिष शेलार म्हणाले की, संसद सुरू होती, त्याचवेळी इतर राज्यांत सभागृह सुरू होतं. अहो दोन-दोन दिवस सभागृह चालली, आता तुम्हाला त्रास झाला, त्यावेळी लोकशाही धोक्यात नव्हती.

२२७ आणि २३६ वरून आरोप करणारे राजकारण करत आहेत. सभागृह किती वेळ चाललं, याचा आव आणला जातो, पण तुमचं सरकार असताना किती दिवस अधिवेशन घेतलंत, सभागृह चालवलं? असं आशिष शेलार सभागृहात बोलताना म्हणाले. संसद सुरू होती, अन्य राज्यातील विधानसभा सुरू होत्या, यांना आज सभागृहाच्या कामकाजाची आठवण येतेय, असं म्हणत आशिष शेलारांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं.

त्यानंतर याच मुद्द्यावरुन आशिष शेलार – भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. खडाजंगीनंतर प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेलं. आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात एकेरी भाषेत हमरीतुमरी झाली. त्यानंतर हे सभागृह आहे, नाचायला स्टेज आहे का? असं म्हणत शेलारांनी भास्कर जाधवांना सणसणीत टोलाही लगावला आहे.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss