spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ajit Pawar यांना दणका; Sharad Pawar गटात होणार आणखी एक आमदाराची एन्ट्री?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नाट्यात उलथापालथी होत आहेत. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. अशातच त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय.

अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी  घरी जयंत पाटील दाखल झाले आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना उधाण  आलंय. बाबाजानी दुर्रानी अजित पवार गटाचे विद्यमान परभणी जिल्हा अध्यक्ष आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य देखील आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ‘राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते,’ असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात अजित दादा व शरद पवार पुन्हा एकत्र होतील का ? असा प्रश्न पुढे येत आहे.

एकंदरीतच अजित पवार यंकची अवस्था ही ‘न घर का न घाट का’ अशी झालेली दिसत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला या सर्वांचा मोठ्याप्रमाणावर तोटा भोगावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या तणावात अधिकची ही भर पडली आहे.

Heavy Rainfall : Department of Meteorology चा अंदाज पुन्हा चुकला ; पूरग्रस्त परिसरात पूर ओसरला

 “लाडका भाऊ आणि बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष व्यवस्थित चालले असते.” पदाधिकारी मेळाव्यात Raj Thackeray यांनी लागावला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss