spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तर धनुष्यबाण कायमच गोठू शकतं, शिवसेनेच्या वादावर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया

पण, जर या प्रक्रियेला खूपच वेळ लागत असेल तर मग निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेमकी कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार? या वादाचा आज तरी निकाल लागेल असे वाटत असताना केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असणारी आता येत्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. आजची ही सुनावणी झाल्यानंतर यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे राजकीय चिन्ह गोठवले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत. उज्ज्वल निकम म्हणाले की, निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोगाला पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी नक्की कोणत्या गटाच्या बाजूने आहेत हे तपासावे लागेल. पण, जर या प्रक्रियेला खूपच वेळ लागत असेल तर मग निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे.

उज्ज्वल निकम म्हणाले…

जेव्हा राजकीय पक्षाच्या चिन्हाबाबत प्रश्न निर्माण होतो किंवा मग राजकीय पक्षावर प्रश्न निर्माण होतो. तेव्हा निवडणूक त्या पक्षाची घटना तपासते. प्रत्येक पक्षाची घटना आयोगाकडे नोंदवलेली असते. त्यामुळे, राजकीय पक्षाचे पदाधिकारी घटनेनुसार निवडून आलेत का आणि कोण कोणाच्या बाजूने आहे? हे आयोगाला तपासता येते.

तसेच राजकीय पक्षाचे आमदार कोणत्या गटाचे आहेत? हे पहिले जाते. तसेच दोन्ही गटांनी किंवा पक्षांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रांमधील दावे प्रतिदावे तपासले जातात. प्रतिज्ञा पत्र खोटे की हेही पाहिले जाते. त्यात किती खरेपणा आहे, हेही पाहिले जाते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो.

सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली आहे की शिवसेना राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाला असावं याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. त्यामुळे त्या सोळा आमदारांची पात्रता किंवा अपात्रता हा निवडणूक आयोगापुढचा विषय राहणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूचे आहेत ही बाब तपासावी लागेल. या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागत असेल तर कदाचित केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते.

हे ही वाचा:

कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदला, माजी आमदार आशिष देशमुख यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

IBPS SO Result 2023 आईबीपीएस एसओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर, या पद्दतीने करा डाउनलोड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss