By Election Result : ६ राज्यांतील ७ विधानसभांसाठीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल

देशात ६ राज्यांतील (Maharashtra News) विधानसभेच्या (Assembly Election 2022) ७ रिक्त जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा आज निकाल आहे. या पोटनिवडणुका म्हणजे, २०२४ विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचंही सांगितलं जात आहे.

By Election Result : ६ राज्यांतील ७ विधानसभांसाठीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल

देशात ६ राज्यांतील (Maharashtra News) विधानसभेच्या (Assembly Election 2022) ७ रिक्त जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा आज निकाल आहे. या पोटनिवडणुका म्हणजे, २०२४ विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचंही सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपनं (BJP) अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. पण इतर ठिकाणी मात्र भाजपची कसोटी पाहायला मिळणार आहे.

आज ६ राज्यांतील विधानसभेच्या ७ रिक्त जागांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व (Andheri East), उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ (Gola Gokaran Nath), हरियाणातील आदमपूर (Adampur), बिहारमधील मोकाम (Mokama) आणि गोपाळगंज (Gopalganj), तेलंगाणातील मुनुगोडे (Munugode) आणि ओदिशातील धामनगर (Dhamnagar) मधील या पोटनिवडणुकीच्या निकालाचा समावेश आहे.

या पोटनिवडणुकीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या आदमपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. भजनलाल यांची नात भव्या बिश्नोई (आदमपूर विधानसभा मतदारसंघ, हरियाणा) आणि अनंत सिंग यांची पत्नी नीलम देवी (मोकामा विधानसभा मतदारसंघ, बिहार) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांचे भवितव्य ठरणार आहे. बिश्नोई भाजप, तर नीलम राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अनंत सिंह यांना अपात्र ठरवल्यानंतर बिहारमधील मोकामा जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली.

याशिवाय बिहारमधील गोपालगंज, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. ज्या सात जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षात लढत आहेत. त्यापैकी तीन जागा भाजपकडे, तर दोन काँग्रेसकडे होत्या. तसेच शिवसेना आणि आरजेडी प्रत्येकी एक जागा मिळाली होती.

बिहार पोटनिवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि आरजेडीमध्ये आहे. तर हरियाणात भाजप, काँग्रेस, आयएनएलडी आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि ओडिशात बीजू जनता दल (बीजेडी) यांच्या विरोधात भाजप आहे.

एकीकडे हिमाचल प्रदेश, गुजरात आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक राजकीय पक्ष या निवडणुकीत व्यस्त असताना दुसरीकडे आज विविध राज्यांच्या विधानसभांच्या रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल आहे. पोटनिवडणुकीच्या या निकालावर शिवसेना, भाजप, काँग्रेस, सपा आणि इतर अनेक राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. या निकालांचा गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालांवर परिणाम होईल की नाही, हे येत्या काळात समोर येईल.

अंधेरी पूर्व येथे ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान ३ नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

६ राज्यांतील विधानसभेच्या ७ रिक्त जागांचा निकाल कुठे पाहाल?

निवडणूक निकाल पाहण्यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI – Election Commission of India) अधिकृत वेबसाइट eci.gov.in वर जा.
येथे निकाल पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला ज्या निवडणुकीचा निकाल पाहायचा आहे ते पर्याय निवडा.
यानंतर तुम्हाला ज्या विधानसभेच्या जागेचा निकाल पाहायचा आहे, त्या जागेचा पर्याय निवडा.

हे ही वाचा :

Andheri Bypoll Result : गुलाल कोणाचा? अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version