बोगस प्रतिज्ञापत्रावर नाशिक-कोल्हापूरसह चार जिल्ह्यात ठाकरे गटाची मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास

बोगस प्रतिज्ञापत्रावर नाशिक-कोल्हापूरसह चार जिल्ह्यात ठाकरे गटाची मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला. आता दोन्ही गटाकडून खरी शिवसेना कोणती यावरून मोठा वाद सुरु झाला आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. तर आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत. ठाकरे यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडे चार हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. पोलीस अधीक्षकांचे कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकरे गटाच्या शपथपत्रांवर शिंदे गटाने आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्र सादर झालेली आहेत.

ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता आपला तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूरमध्ये पोहोचले असून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये या संपूर्ण बाबींचा तपास केला जात आहे. कोल्हापुरात दाखल झालेले मुंबई क्राईमचे दीपक सावंत यांनी बोलताना मुंबईच्या निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आम्ही येथे तपासणी करण्यासाठी आलो असून ठाकरे गटाच्या शपथपत्रांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूरमध्ये सध्या १४०० ते १५०० शपथपत्र तपासणी करणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधात जास्त आंदोलन केली जातात त्या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली जाते. आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली आहेत. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रँचला आमचे सर्व ते सहकार्य राहील असे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास ४६००च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही प्रतित्रापत्रे ठाकरे गटांसाठी तयार केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरुन देत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. या बनावट प्रतिज्ञा पत्राचा तपास मुंबई पोलिसांच्या गु्न्हे अन्वेशषण विभागाने सुरु केला आहे.

हे ही वाचा:

Double XL Trailer: हुमा आणि सोनाक्षीच्या ‘डबल एक्‍सएल’ चित्रपटामध्ये ‘हा’ खेळाडू साकारणार भूमिका

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाई वाढली, ७.४१ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version