spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Cabinet : अखेर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?; ‘या’ दिवशी होणार विस्तार

शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तार लवकच होणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गट तसेच भाजपमधील (BJP) जे नेते नाराज झाले होते त्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर येथे दाखल, आजपासून सलग पाच दिवसांचा ‘मिशन विदर्भ’ दौरा

पितृपंधरा संपल्यानंतर लगेचच मंत्रीमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहे. याआधी विस्तार रखडल्याने भाजपमुळेच नव्याने विस्तार होण्यात अडचणी असल्याचे शिंदे गटातील आमदारांनी मत व्यक्त केलं आहे. गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक मंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवामध्ये ठिकठिकाणी दौरे केले. त्यानंतर तरी आता नवे मंत्री कामाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. मात्र, तसे झाले नाही. पितृपंधरवड्याच्या धास्तीने १८ पैकी १३ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारलेला नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. विस्तार २४ ऑगस्टला झाला आहे. मात्र अनेक मंत्र्यांनी अजूनही कारभार स्विकारलेला नाही.

Dasara Melava : शिंदे गटाचा अर्ज मुंबई मनपाने स्विकारला, आता शिवसेने काय ?

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गट यांच्यात बैठक झाली आहे. याच मुद्द्याला घेऊन फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत पाच ते सहा वेळा दिल्ली दौरा केला आहे.

राशी भविष्य १८ सप्टेंबर २०२२, मीन राशीच्या लोकांच्या अधिकारात वाढ होईल

Latest Posts

Don't Miss