राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज, शिंदे व फडणवीस यांचे पारडे समान

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज, शिंदे व फडणवीस यांचे पारडे समान

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराची तयार राजभवनात सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्र्यांशी बैठक झाली आहे. काहीच वेळात शपतविधी सोहळा सुरु होणार आहे. आणि राजभवनात कार्यक्रमापूर्वीची तयारी सुरू आहे. समोर आलेल्या माहिती नुसार आज एकूण 18 मंत्र्यांना मंत्रिपद मिळणार आहे. यात 9 मंत्री हे शिंदे गटातील आहेत. तर भाजपची 9 मंत्री हे आज मंत्रीपदाची शपत घेणार आहे.

भाजपातील मंत्रिपदाची शपत घेणारे मंत्र्यांच्या नावाची यादी :

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
गिरीश महाजन
माधुरी मिसाळ
संभाजी पाटील निलंगेकर
सुरेश खाडे
मंगल प्रभात लोढा
विजयकुमार गावित
रवींद्र चव्हाण

शिंदे गटातील मंत्रिपदाची शपत घेणारे मंत्र्यांच्या नावाची यादी :

उदय सामंत
दीपक केसरकर
दादा भुसे
संजय राठोड
संजय शिरसाट
तानाजी सावंत
संदिपान भुमरे
शंभुराज देसाई

आज राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. या सोहळ्यात नेमकी कुणाला संधी मिळणार व कोणच्या पदरी नाराजी पडणार हे आपण गरजेचे ठरणार आहे. शपथविधीपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली असून, मंत्रिमंडळात कोणाला स्थान दिलं जाईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आता सर्व आमदार राजभवनाच्या दिशेने निघाले असून काहीच वेळात शपथविधी पार पडणार आहे. राज्य्भवनात अनेक मान्यवर नेते उपस्थित आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल – दादा भुसे

Exit mobile version