Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार – देवेंद्र फडणवीस

महाविकास विकास आघाडीची सत्तापालट करत सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या ९ आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली होती तर भाजपच्या ९ आमदारांना संधी देण्यात आली होती.

Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

महाविकास विकास आघाडीची सत्तापालट करत सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या ९ आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली होती तर भाजपच्या ९ आमदारांना संधी देण्यात आली होती. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या गटातील काही मंत्री नाराज झाल्याने धुसफूस सुरू होती. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेेद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर दुसरा मंत्रीमंडळ होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळं आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळतेय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान दोन्ही गटांकडे समान मंत्री असल्याने दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपला जास्त जागा मिळाल्यास बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेक आमदार इच्छुक असल्याने कोणाकोणाचे समाधान करायचे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आहे. फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट सांगितल्याने यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन होईल. राज्य सरकारची तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे, असे सांगतानाच या अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचं सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसं घडलं नाही, त्यामुळं त्यांनी अनेकदा जाहीररित्या नाराजीही व्यक्त केली होती. पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पहाणं औत्सुक्याच ठरणार आहे.

हे ही वाचा:

Whats App : दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version