Cabinet Expansion : विस्तार झाला मात्र, खातेवाटप रखडल्याची कारणे आली समोर

Cabinet Expansion : विस्तार झाला मात्र, खातेवाटप रखडल्याची कारणे आली समोर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिला आणि लगेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना व भाजपची युती करत नवं सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री पदाचा शपथविधी सोहळा होऊन 39 दिवस पूर्ण झाले आणि अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गट व भाजपातील एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता खातेवाटप रखडले आहे.

या खातेवाटप राखल्या मागची दोन कारण समोर येत आहे. यातलं पहिलं कारण म्हणजे, शिंदे गट आणि भाजपमध्ये ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. आणि त्यामुळेच खातेवाटप रखडल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांना ऊर्जा आणि उद्योग ही दोन खाती हवीत. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून आग्रह असल्याचे दिसून येत आहे. यावर तोडगा निघेल तेव्हाच खातेवाटप मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी खातेवाटप विषयी म्हटले

नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले,” 17 ऑगस्टला राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वीच खाते वाटप होऊ शकते. कारण, अधिवेशनामध्ये मंत्र्यांना त्या विभागाशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देखील द्यावी लागणार आहेत. आणि यासाठी मंत्र्यांना त्या भागाचा अभ्यासह करावा लागेल. त्यामुळे मला नाही वाटतं की खाते वाटपाला जास्त उशीर होईल. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच योग्य निर्णय घेतील असे गिरीश महाजन यांनी यावेळी आपले स्पष्ट केले.

खाते वाटपबाबत मंत्री विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया

सध्या राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन दिवस होऊनही मंत्र्यांना खाती मिळालेलीच नाहीत. मात्र हा खातेवाटप पुढील दोन दिवसात होईल असा विश्वास. जो काम करू शकेल अशा मंत्र्यांना मंत्रिपद देणार. 20 मंत्री आणि जास्त खाते असल्यानं वाटपाला वेळ लागतोय. कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्यांना कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय, असे विजयकुमार गावित यांनी सांगितलं.

हेही वाचा : 

‘पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं’, एकनाथ खडसेंचा सल्ला

Exit mobile version