spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा एकदा होणार मंत्रिमंडळचा विस्तार? मंत्रिपदे झाली २६ तर उरली फक्त १४ मंत्रिपदे रिक्त

सध्या राज्यात १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आणि २६ मंत्री झाले आहेत. एकूण आमदारांच्या १५ % म्हणजे ४३ पर्यंत मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्याने आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का?

काल दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामॊठी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु आता शिंदे गटाचे नेते, भाजपचे नेते आणि आता राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी बंड केला असे सर्व नेते सरकार मध्ये आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा होणार मंत्रिमंडळचा विस्तार होणार का अश्या चर्चांना उधाण आले आहे.

सध्या राज्यात १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आणि २६ मंत्री झाले आहेत. एकूण आमदारांच्या १५ % म्हणजे ४३ पर्यंत मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्याने आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का? आता एकूण २९ मंत्रिपदे व्यापली गेली आहेत. तरीही अजूनही १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनंतर झाला. त्यामुळे आता उर्वरित १४ पदाचे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

मुख्यमंत्र्यांकडील खाती : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण, खार जमिनी विकास, अल्पसंख्याक विकास व औफाक.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडील खाती : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

अतिरिक्त खाती असलेले अन्य मंत्री

भाजप

  • राधाकृष्ण विखे पाटील (महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास)
  • सुधीर मुनगंटीवार (वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय)
  • चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य)
  • गिरीश महाजन (ग्रामविकास-पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण)
  • रवींद्र चव्हाण (सार्व. बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण)
  • मंगलप्रभात लोढा (पर्यटन, काैशल्य विकास आणि उद्योजगत, महिला व बालविकास)
  • अतुल सावे (सहकार, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग)

शिंदे गट

  • दीपक केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा)
    तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण)
    संदीपान भुमरे (रोजगार हमी, फलोत्पादन)
    दादाजी भुसे (बंदरे व खनिकर्म)

हे ही वाचा:

अजित पवारांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे भावुक, भाऊ अजित पवारांशी लढू शकत…

Sharad Pawar कराडसाठी रवाना, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं घेणार दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss