मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 13,600 रुपये

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 13,600 रुपये

शिंदे - फडणवीस सरकारचे बहुप्रतीक्षीत खाते वाटप

मुंबई : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची पहिला बैठक आज पार पडली. या बैठकी दरम्यान, पुसग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी 13,600 रुपये मदत मिळणार आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी आणखी पंचनामे सुरु आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेत पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत इतकी कधीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती, इतकी देण्याचा निर्णय झाला आहे. एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल.’ असे आश्वासन मुखमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

बैठकी दरम्यान मेट्रो-३ बाबत महत्वाची घोषणा

मेट्रो-३ च्या कामाला वेग येणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून प्रतिदिन 13 लाख प्रवाशी प्रवास करतील. यामुळे एकूण सहा लाख वाहनांच्या ट्रिप रस्त्यांवरुन कमी होतील. भविष्यात 2031 पर्यंत यातून 17 लाख लोक प्रतिदिन मेट्रोतून प्रवास करतील. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा या प्रकल्पामधून मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला सर्व मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : 

‘शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

Exit mobile version