पप्पू म्हणणं दुर्देवी, आरबीआयचे माजी गव्हर्नरकडून राहुल गांधी यांची स्तुती

पप्पू म्हणणं दुर्देवी, आरबीआयचे माजी गव्हर्नरकडून राहुल गांधी यांची स्तुती

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गेल्या काही महिन्यांपासून भारत जोडो यात्रा सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातील नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळालेला आढळून आले आहे. या यात्रेत ग्रामीण भागातील हजारो लोक सामील झाले आहेत. त्याच बरोबर अनेक सेलिब्रिटी, विचारवंत, साहित्यिक, आर्टिस्टही राहुल गांधी यांच्या या यात्रेत सामील झाले आहेत. या यात्रेमुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पप्पू ही इमेज मिटून गेली आहे. यावरूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी (Raghuram Rajan) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची स्तुती करत मोठं वक्तव्य केलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) हे दावोस येथे विश्व आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळेस रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाष्य करत राहुल गांधींची स्तुती केली आहे. रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी या सभेत राहुल गांधी यांच्याबद्दल सांगताना म्हणाले की “राहुल गांधी (Raghuram Rajan) यांना पप्पू म्हणणं दुर्देवी आहे. मी अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली आहे. जवळपास एका दशकापासून मी त्यांच्याशी चर्चा करत आहे. राहुल गांधी कोणत्याही प्रकारे पप्पू (मूर्ख) नाहीयेत. ते स्मार्ट युवा आहेत आणि जिज्ञासू व्यक्तीही आहेत”, रघुराम राजन यांनी पुढे सांगितलं की जोखीम, जबाबदारी आणि त्याचं मूल्यांकन करण्याची एखाद्या व्यक्तीत चांगली समज असावी लागते. राहुल गांधी यांच्यात ती समज आहे. त्यासाठी ते सक्षम आहेत”.

रघुराम राजन हे (Raghuram Rajan) भारत जोडो भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. रघुराम राजन हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत बरंच अंतर चालतही गेले होते. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेसंदर्भात रघुराम राजन यांनी सभेत सांगितले की” ते भारत जोडो यात्रेत सामील झाले . कारण मी यात्रेच्या मूल्यांशी सहमत आहेत. पण याचा अर्थ मी कोणत्या राजकीय पक्षात सहभागी होतोय असं नाही”. असे रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेसंदर्भात सांगितल आहे.

हे ही वाचा:

फ्रूट कस्टर्ड बनवायचंय? मग ही इंस्टंट ट्रिक वापरून घरच्या घरीच बनवा अप्रतिम फ्रूट कस्टर्ड

२० जानेवारीला साजरा होणार मूवी लव्हर्स डे, ‘अवतार २’ सह हे चित्रपट पहा फक्त ९९ रुपयात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version