जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होऊ शकतो, अंबादास दानवेंचे कोश्यारी यांना पत्र

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. २१ जून रोजी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये युती झाली होती.

जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होऊ शकतो, अंबादास दानवेंचे कोश्यारी यांना पत्र

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. २१ जून रोजी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये युती झाली होती. त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक मागणी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये अंबादास दानवे यांनी खोचक मागणी केली आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करा. असे त्या पत्रामध्ये म्हंटले आहे.

अंबादास दानवे यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे की, आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या, आपण महाराष्ट्रामध्ये असताना ज्या पद्धतीने मा. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरत चालू ठेवले होतेच. ते कमी झाले की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ-खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलं. याची परिणीती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले असे पत्र अंबादास दानवे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे.

पुढे पत्रामध्ये म्हंटले आहे की, गद्दारी जाणून घेण्यासाठी जगामधील ३२-३३ देशांनी माहिती दिली आहे. जर अशा गद्दारीची जगामधील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होऊ शकतो. तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहामार्फत युनो कडे प्रयाण करावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version