spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादी माजी नगरसेविकेच्या मुलावर झाला गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक रविराज विकास ताकवणे याच्या विरोधात मुंबई उच्चन्यायालयात खटला चालू आहे.

उद्योजक विकास ताकवणे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड येथील माजी नगरसेविका नंदा ताकवणे यांचा मुलगा उद्योजक रविराज ताकवणे याच्या विरोधात याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. साक्ष देण्यापासून नकार करण्याच्या उद्देशाने व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून व्यावसायिकाच्या पत्नीचा विनयभंग केला. हा प्रकार ५ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला.

याप्रकरणी निगडी येथील एका व्यावसायिकाने रविवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक रविराज विकास ताकवणे याच्या विरोधात मुंबई उच्चन्यायालयात खटला चालू आहे. त्यात साक्ष देण्यापासून नकार करण्याच्या उद्देशाने रविराज ताकवणे याने फिर्यादी व्यावसायिकाला शिवीगाळ केली.

तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोबाईलवर अश्लील व अपमानास्पद शब्द वापरून मेसेज पाठवले. व्यावसायिकाच्या पत्नीला अश्लील भाषेत व्हाटसअपवर मेसेज पाठवले. ते मेसेज फिर्यादीच्या पत्नीने वाचल्याने त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.सध्या पोलिस गुन्हेगार विश्वजित खुळे याचा तपास करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss