spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri by poll elections 2022: अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही बाजूने सावध पवित्रा

अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मुरजी पटेल यांच्या बरोबर अर्ज दाखल करण्यासाठी बडे नेते उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते सहभागी झाले. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजप आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपनेही मुरजी पटेलांचे दोन अर्ज दाखल केलत.राजकीय शह काटशहानंतर ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. मूळ शिवसेना ही आमच्या बाजूने असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. अंधेरी निवडणूक कार्यालय बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. निवडणूक कार्यालयाच्या आजूबाजूचा १०० मीटर अंतरावर असलेला परिसर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून संपूर्ण परिसर सील केला आहे.

अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपसाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे. ठाकरे गटाच्या ऋुतुजा लटके यांच्या महापालिकेतील सेवेचा राजीनामा आज प्रशासनाने स्वीकारला आहे. सुरुवातीली हा राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका घेतलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. आज ऋतुजा लटके यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

मुरजी पटेल यांनी भाजपकडून आपला अर्ज दाखल केला आहे. गत निवडणुकीत शिवसेना- भाजप युती असल्याने ही जागा शिवसेनेच्या रमेश लटकेंना सोडण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यावेळी अंधेरी पूर्वच्या या जागेवर शिंदे गटानेही दावा केला होता. त्यामुळे मुरजी पटेल कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल उत्सुकता होती. शेवटी अंधेरी पूर्वची जागा ही भाजपला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीचाही मार्ग मोकळा झाला.

हे ही वाचा :

video viral : दीपिका पदुकोणने ‘छेल्लो’ शोच्या या अभिनेत्याला दिली किस, चाहत्यांच्या प्रतिक्रिया

RRB Group D Answer key 2022: आरआरबी ग्रुप डी परीक्षेसाठी उद्यापासून नोंदवता येणार आक्षेप , इतकी भरावी लागेल फी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss