पंतप्रधानांवरील माहितीपट हटवण्याचे यूटय़ूब, आणि ट्विटरला केंद्रसरकारने दिले आदेश

पंतप्रधानांवरील माहितीपट हटवण्याचे  यूटय़ूब, आणि ट्विटरला केंद्रसरकारने दिले आदेश

नुकतच ‘बीबीसी’ने (BBC) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्यावर एक माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाचे नाव आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. कारण हा माहितीपट सोशल मीडियावरून प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकावा असे आदेश केंद्र सरकारकडून जरी करण्यात आले आहेत. त्याच बरोबर पंतप्रधान मोदींवर अशा प्रकारचा माहितीपट काढल्याबद्दल निवृत्त अधिकारी, माजी न्यायमूर्तीनी “हा माहितीपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीच्या हेतूने केल्याचे म्हणत “‘बीबीसी’ला फटकारले आहे. पण तरीही बीबीसीकडून या माहितीपटाच्या समर्थन करण्यात आले आहे.

केंद्रसरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीबीसीकडून काढण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटाच्या पहिल्या भागाच्या व्हिडीओ बंद करण्याचे निर्देश यूटय़ूबला दिले आहेत. त्याचबरोबर या माहितीपटाचे यूटय़ूब व्हिडिओमध्ये लिंक असलेले ५० हून अधिक संदेश हटविण्याचे आदेश ट्विटर या समाजमाध्यम कंपनीलाही देण्यात आले आहेत. कारण ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ (India: The Modi Question) हा माहितीपट गुजरातमध्ये झालेल्या दंगली संबंधित आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माहितीपटातून मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून दंगलीशी संबंधित काही घटकांवर आधारित दोन भागांचा हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. भारतात हा अजून प्रसारीत झाला नसून यूट्यूब (Youtube) व ट्विटरवर (Tweeter) त्याचा काही लिंक आल्या आहेत. पण आता या सर्व लिंक हटवण्यात आल्या आहेत.

बीबीसी कडून काढण्यात आलेल्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटाचे अनेक खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परीक्षण केले. त्यात त्यांना असे आढळले की हा माहितीपट भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका निर्माण करणारे आशय या मध्ये असून अन्य देशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांवर आणि देशातील सार्वजनिक व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होऊ शकेल अश्या गोष्टी यामध्ये आढकळल्या आहेत. म्हणून या माहितीपटाला सोशलमिडीयावरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

Pathan Advance Booking बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ ची जादू, ऍडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली लाखोंची कमाई

‘Kantara 2’ वर ऋषभ शेट्टीचा शिक्का, कांतारापेक्षा जास्त असणार चित्रपटाचं बजेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version