ईडीच्या भीतीने काही जणं भाजप सोबत गेले – छगन भुजबळ

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे.

ईडीच्या भीतीने काही जणं भाजप सोबत गेले – छगन भुजबळ

chhagan bhujbal

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे. काही जण ईडीच्या (ED) धाकामुळे भाजपसोबत (BJP) गेले आहेत. शिवसेना (Shivsena) संपावी असं मला अजिबात वाटत नाही. कारण शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी सहभागी होतो. असं वक्तव्य छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. नाशिक मधील अनेक शिवसेना शाखांचे मी उद्घाटन केले आहे. अनेकांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले. त्यामुळे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना टिकावी अशी माझी इच्छा आहे. येवला दौऱ्यावर असताना छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत केलेल्या सत्ता स्थापनेबाबत हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल का या प्रश्नावर, लग्न झाल्यावर लगेचच घटस्फोट घ्या असं आपण म्हणत नाही. त्यामुळे नव्या सरकारला नांदा सौख्यभरे अशा शुभेच्छा देतो. हे उत्तर त्यांनी दिले. आता नव्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावेत ही आशा भुजबळ यांनी व्यक्त केली. सध्या शिवसेना पक्षात तणाव सुरू आहेत हे सर्वश्रुत आहे. पण पक्ष संपावा असं आपल्या मनात अजिबात नाही.
सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्ज वाटपाचे काम सुरू करावे. शेतकऱ्यांना शेतीसाठी विक्रेत्यांकडून आवश्यक बि बियाणे, खत खरेदी करताना अडचणी येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. असं छगन भुजबळ म्हणाले. आता भुजबळांच्या त्या वकव्यावर काय काय उत्तर मिळतंय हे पहावं लागेल.
Exit mobile version