spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘चला दापोली’ किरीट सोमय्यांचा नवा नारा, मविआ नेत्या विरुद्ध आक्रमक पवित्रा

महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार नेत्यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्यांनी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. परब यांच्याशी संबंधित कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. त्यानंतर आता सोमय्या दापोलीला रवाना झाले आहेत. मांडवी एक्स्प्रेसमधून सध्या सोमय्या प्रवास करत आता ते खेडमध्ये दाखल झाले आहेत.

हेही वाचा : 

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या ४९व्या सरन्यायाधीशपदी उमेश लळीत विराजमान

किरीट सोमय्या खेड मध्ये पोहताच त्यानी माध्यमांशी संवाद साधला “उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी शहाणपणा दाखवला. त्यांनी दापोलीतल्या मुरुड येथील त्यांचा बंगला आधीच जमीनदोस्त केला. मात्र अनिल परब गाढव आहे, ठाकरे सरकारमधले अधिकारी विकले जाऊ शकतात. मात्र किरीट सोमय्या, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस विकले जाणार नाहीत, अशा शब्दांत सोमय्यांनी घणाघाती टीका केली.

डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय, नीरज चोप्राचं सर्वत्र कौतुक

काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मढमधील स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. नियमात बसत नसताना देखील आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली आणि त्यातून स्टुडिओचं व्हॅल्युएशन असलेल्या एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

धर्मवीर यांच्यावर आधारित २ पुस्तके लवकरच होणार प्रदर्शित : मंगेश देसाई

Latest Posts

Don't Miss