शिवसेनेच्या विजयानंतर चंद्रकांत खैरेंना झाले अश्रू अनावर म्हणेल, ‘कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय’

''हा कोट्यवधी शिवसैनिकांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा भावनिक विषय आहे.

शिवसेनेच्या विजयानंतर चंद्रकांत खैरेंना झाले अश्रू अनावर म्हणेल, ‘कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय’

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर गेली अनेक वर्षे शिवसेना सातत्याने शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करत आहे. पण यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची संधी नक्की कुणाला मिळणार, ठाकरे गटाला कि शिंदे गटाला मिळणार? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर होता. अखेर आज उच्च न्यायालयाने ठाकरेंच्याबाजूने निर्णय दिल्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मात्र अतिशय भावूक झाले असून त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.

कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ”आई जगदंबेच्या कृपेने हा न्याय मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कोट्यवधी शिवसैनिकांचा हा विजय आहे. मी सकाळपासूनच खूप चिंतेत होतो. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप छळलं, न्याय दिला नाही, परंतू न्यायपालिकेनं अखेर न्याय दिला. यातून परमेश्वराकडं न्याय आहे, हे ही दिसून आलं.

चंद्रकांत खैरे या निर्णयानंतर अत्यंत भावूक झाल्याचं दिसून आले असताना ते म्हणाले, ”हा कोट्यवधी शिवसैनिकांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा भावनिक विषय आहे. गेली अनेक वर्षे दसरा मेळावा होत असलेल्या शिवाजी पार्कवर हा कार्यक्रम होणं हा अत्यंत भावनिक विषय आहे.” सध्यातरी आम्ही दसरा मेळाव्याच्या तयारीला लागणार असल्याचंही ते म्हणाले.

काय म्हणाले विनायक राऊत?

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. “न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात देखील शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल. आमची न्यायाची बाजू आहे. आमच्याकडे कोणतीही खोट नाही. आम्ही प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेतो. येवळी देखील ही दक्षता देण्यात येईल आणि दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आमची न्यायाची बाजू आहे: विनायक राऊत

Uddhav thackeray live : विजय नेहमी सत्याचाच होतो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version