चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या अडचणीत वाढ, ऑडिओ क्लिप वायरल

चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या अडचणीत वाढ, ऑडिओ क्लिप वायरल

सध्या अनेक ठाकरे गटाचे नेते वादात सापडताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former Aurangabad MP Chandrakant Khaire) यांच्या मुलाची एक कथित ऑडिओ क्लीप (Alleged audio clip) सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मविआ सरकारच्या काळात एका सरकारी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी खैरेंचे सुपुत्र ऋषिकेश यांनी २ लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास येत आहे. यामुळे खैरे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. बदली न झाल्यामुळे हा कर्मचारी त्यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावत असल्याचेही या ध्वनीफितीत ऐकायला येत आहे.

या सर्व प्रकरणावर ऋषिकेश खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, कोरोनाच्या आधी माझा एका मित्र त्याच्या पत्नीची बदली करण्यासाठी माझ्याकडे आला होता. त्यावेळी ठाकरे सरकार असल्याने करून देऊ, असे मी त्याला सांगितले होते. पण अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण त्यांचे काय पैसे माझ्याकडे असतील ते देण्यासाठी मी तयार असल्याचं ऋषिकेश खैरे म्हणाले. मात्र महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.

वायरल ऑडिओ क्लिप वायरल

ऋषीकेश खैरे: हॅलो

विजय: बोला भाऊ

ऋषीकेश खैरे: कुठे आहे तू…

विजय: इकडे शेंद्राला होतो…

ऋषीकेश खैरे: आ…

विजय: शेंद्राला

ऋषीकेश खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले

विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बर तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले भाऊ

ऋषीकेश खैरे: आज काय तारीख आहे, २३ तारीख आहे…पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो

विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.

ऋषीकेश खैरे: १०० टक्के होईल

विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे

ऋषीकेश खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझे काम करून देतो किंवा पैसे देतो

विजय: नाही काम करूच नका, काम करून घेतो मी दुसरीकडून, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी

ऋषीकेश खैरे: अच्छा दिलेले आहे का?

विजय: हो…

ऋषीकेश खैरे: पैसे देऊन टाकतो..

विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी…..

ऋषीकेश खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो

विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी…

ऋषीकेश खैरे: होय…

विजय: बर ठीक आहे चालेल… फोन कट

हे ही वाचा:

आणखी एका लैंगिक छळाच्या दोषी आसाराम बापू, उद्या होणार शिक्षेची घोषणा

पाकिस्तानात महागाईचा भडका, २०० पार पोहोचल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version