छगन भुजबळांच्या प्रश्नाला चंद्रकांत पाटलांचं प्रतिउत्तर

छगन भुजबळांच्या प्रश्नाला चंद्रकांत पाटलांचं प्रतिउत्तर

भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. तसंच काही पोलीस अधिकाऱ्याचंही निलंबन (Police officer suspended) करण्यात आलं आहे. शाईफेकीच्या घटनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी आजही भाष्य केलं आहे. ‘काल झालेल्या शाईफेकीचा कट पूर्व नियोजित होता आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही, पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का?’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात आज चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. पाटील यांनी यावेळी माध्यमांशी (media) संवाद साधताना शाईफेकीवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

शाईफेक करणारा फुले, शाहू आंबेडकरांचा पाईक आहे, कुणाच्या जीवाला धोका निर्माण होईल अस वागू नये हे ठीक आहे. पण, वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहात? असा प्रश्न छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित केला आहे. पुढे भुजबळ म्हणाले, की शाई फेक प्रकरण अनेकवेळा झालं. नाशिकला साहित्य संमेलनात संपादक गिरीश कुबेर त्यांच्यावर शाई फेक झाली. त्यांनी शाई पुसून भाषण केले. शाई फेकणाऱ्याला पकडलं, ते निघून गेले. काल ज्याने शाई फेकली त्याच्यावर ३०७ कलम लावलं, खुनाचा प्रयत्न? मला हे कळलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू यांच्या विरोधात बोलतील, त्यांना विरोध करणारा जो कोणी असेल तो आपला, असंही छगन भुजबळ शेवटी म्हणाले.

काल शनिवारी झालेली शाईफेक ही पुर्व नियोजित होती. याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. माझ्या डोळ्याला काही वर्षांपुर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही. पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांना जाऊन सांगा की माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झालय. ३०७ चे कलम का लावले यावरुन भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला आहे. हे सांगताना पाटील पुढे म्हणाले, की छगन भुजबळ अजून जामिनावर आहेत हे विसरू नये.

हे ही वाचा : 

चंद्रकांत पाटलांच्या समर्थनासाठी पुण्यात भाजपा रस्त्यावर

हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, निर्भया पथकाच्या गाड्या बंडखोर आमदारांच्या ताफ्यात

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version