चंद्रकांत पाटलांचा मोठा निर्णय, कारवाया मागे घेण्याच्या दिल्या सूचना

चंद्रकांत पाटलांचा मोठा निर्णय, कारवाया मागे घेण्याच्या दिल्या सूचना

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jotiba Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद गेले काही दिवस राज्यभर उमटले. त्यातच पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे शाईफेक झाल्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला. मात्र, त्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

घडलेल्या प्रकरणात कोणाविषयी काहीही तक्रार नाही. ज्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले, पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवरची निलंबनाची कारवाई केली होती आणि ज्या पत्रकारावरदेखील कारवाई करण्यात आली त्या सगळ्यांवरच्या कारवाया मागे घ्याव्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. तोंडावर शाईफेक झालेल्या प्रकरणावर काहीही मत नाही आहे. या वादावर पडदा टाकत आहे. त्यामुळे हा वाद थांबवावा, अशी देखील विनंती त्यांनी केली आहे.

बाबासाहेब आंबेडकर, महत्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं वक्तव्य औरंगाबादमधील (Aurangabad) एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. राज्यभर त्यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या अंगावर समता दलाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. शाईफेक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय काही पोलिसांचं आणि अधिकाऱ्यांचं निलंबन आणि अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. या सगळ्या शाईफेक प्रकरणात पत्रकाराचा समावेश आहे, असं कळल्यावर पत्रकाराला देखील ताब्यात घेतलं होतं. नंतर त्या पत्रकाराची सुटका केली होती. सोबतच चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडच्या घराबाहेर व्हिडीओ तयार करुन शाहू, फुले, आंबेडकर वाचा, असं आवाहन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती. मात्र या सगळ्यांवर झालेली कारवाई मागे घेण्याच्या सूचना चंद्रकांत पाटलांनी केल्या आहेत. यावर आता विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

Instagram Reel कशी डाउनलोड करायची ? जाणून घ्या सोपी पद्धत

निर्भया पथकाच्या गाड्या वापरल्याच्या आरोपाला चित्रा वाघ यांचं प्रतिउत्तर

Pune Rickshaw Driver Protest पुण्यात रिक्षा आंदोलकांचा उद्रेक! रिक्षा सोडून चालक निघाले घरी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version