Grampanchayat Election : आता फक्त भाजप आणि शिंदेंच्या सेनेचा झेंडा फडकणार, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

Grampanchayat Election : आता फक्त भाजप आणि शिंदेंच्या सेनेचा झेंडा फडकणार, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा मुंबई महानगरपालिका निवडणूक असो, आता फक्त भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचाच झेंडा फडकणार असल्याचे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल काही भागातील समोर आले आहेत. यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विजय होताना दिसत आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी यापुढे फक्त भाजप आणि शिंदे यांच्या गटाचाच झेंडा लागणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ७० हून अधिक अंगणवाडींना आवश्यक साहित्य आणि पोषण आहार वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलता हे व्यक्तव्य केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान

दरम्यान, जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

हेही वाचा : 

शिवसेनेचा आक्रमक इशारा, शिवतीर्थचा मुद्दा ताणल्यास थेट उतरणार मैदानात

जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये, आजरा तालुक्यातील करपेवाडी, चंदगड तालुक्यातील इसापूर आणि राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सरपंच थेट जनतनेतून निवडला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने बाजी मारली. तालुक्यातील पिंपळगाव खूर्दमध्ये मंडलिक-मुश्रीफ गटाने निर्विवाद विजय मिळवला. थेट सरपंच निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या शीतल नवाळे यांनी ३९८ मतांनी विजय मिळवला. ग्रामपंचायतीमध्ये मुश्रीफ-मंडलिक गटाचे ८ तर ३ जागांवर घाटगे गटाचे उमेदवार विजयी झाले.

लीक व्हिडिओ क्लिपने चंदीगड विद्यापीठाला हादरवले; मुलींच्या वसतिगृह, दोन पुरुष ताब्यात

Exit mobile version