चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, उद्धव ठाकरे हे आजकाल जे काही बोलतात ते फर्स्ट्रेशनमधून येतंय

चं जे बोलणं आहे ते फर्स्ट्रेशनमध्येच (depression) आहे. दुसरं काही नाही,

चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, उद्धव ठाकरे हे आजकाल जे काही बोलतात ते फर्स्ट्रेशनमधून येतंय

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामतीत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजकाल जे काही बोलतात ते फर्स्ट्रेशनमधून येतंय. ठाकरे यांना रोज झटके बसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांना रोज 440 व्होल्टेजचा करंट देतायत. त्यामुळे ते त्या मानसिकतेतून बोलत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.महापालिकेतील निकालानंतर त्यांना त्याची चूक कळेल. हिंदुत्वापासून ते किती दूर गेलेत हे त्यांना आज नाही कळणार. त्यांचं जे बोलणं आहे ते फर्स्ट्रेशनमध्येच (depression) आहे. दुसरं काही नाही, असंही ते म्हणाले.

भाजपचे नेते अमित शहा हे काल उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत बोलले नाहीत. त्यांनी भाजपसोबत कसा दगा झाला हे मांडलं. आता दगा करणारे आणि दग्यामुळे त्यांचे झालेले नुकसान यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले. यातूनच ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलाय.आतापर्यंत शिवसेनेचं जे काही चांगलं झालं ते अमित शहा यांच्या नेहमीच्या मध्यस्थीमुळे झाले. सामंजस्याने सांभाळून घेतल्यामुळे झालं. पण अमित शहा यांनी केलेली मदत विसरुन पवार साहेबांच्या ट्रॅपमध्ये आहेत. म्हणून अमित शहा यांनी केलेली सर्व मदत विसरले आहेत. शरद पवार यांच्या ट्रॅपमध्ये येवून ते अशी वक्तव्ये करतायत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बारामतीमध्ये आम्ही आमची तयारी करतो. पाच वर्षे तयारी करतो.आमचा नेहमीचाच संघटना वाढवण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये 2019 मध्ये सर्वाधिक मते मिळाली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आमच्यात आले. आम्हीही तयारी करतोय. मी जबाबदारीने सांगतो. आम्ही एक लाख मताने बारामती जिंकू, यात काहीच शंका नाही, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

आम्ही कुणाच्या विरोधात काही बोलतच नाही. आम्ही आमची तयारी करतोय. आम्हाला खासदारांवर, त्यांच्या कामावर, त्यांच्या पक्षावर काही बोलायचं नाही. आम्ही आता पक्ष वाढवतोय. आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. योजना राबवणे यात खेलो होबे नाहीये. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय आणि तो इतका वाढवू की पुढच्या सर्व निवडणुका भाजप-सेना युतीच जिंकेल. दरम्यान, कार्यकारिणी फेरबदलावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तो निर्णय जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. आज काही तो निर्णय झाला नाही. जेव्हा पक्षाला वाटेल तेव्हा फेरबदल करु.

हे ही वाचा:

राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीमुळे शिवसेनेला टेन्शन

भाजप-सेनेच्या स्नेहभोजनाच्यावेळीच राज ठाकरे पोहोचले वर्षावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version