spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा गौप्यस्फोट, अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार ?

सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापल्याच दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपसात चांगलेच भिडले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) हे भाजपाच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु असल्याचं दिसून आलं. तर याच प्रश्नाला उत्तर देतांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra state president of BJP Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे-मोठे नेते प्रवेश करणार असून, महाराष्ट्राला धक्का बसेल, असे प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज औरंगाबादमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

दुसरीकडे, भाजप आमदार संभाजी पाटील (Sambhaji Patil) निलंगेकरांनी अमित देशमुखांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे. ‘लातूरचे प्रिन्स – अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेलेले नाहीत. आता भाजपत येतो, अशी हवा निर्माण झालीये. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, ते पक्षात आलेलं भाजप कार्यकर्त्यांना बिलकुल रुचणार नाही’, असं म्हणत निलंगेकरांनी देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहेत, असा दावा चंद्रशेखर यांनी केला. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांचं पूर्ण पक्ष रिकामा होईल. शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात आहे. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठी नावं आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

गिरगावात झळकले तेजस ठाकरेंचं पोस्टर; आजची शांतता, उद्याचं वादळ, चर्चेला आले उधाण

प्रत्येक भेट ही राजकीयच असेल असं नाही, आंबेडकरांनी केली शिंदेंसोबतच्या भेटीची भूमिका स्पष्ट

त्यात छुपं काय?, शिंदे-आंबेडकर भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss