चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक खुलासा म्हणाले भाजपा नेतेच करतायत पंकजा मुंडेंना बदनाम

चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक खुलासा म्हणाले भाजपा नेतेच करतायत पंकजा मुंडेंना बदनाम

गेल्या कितीतरी दिवसांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच पक्षासंबंधी कोणताही निर्णय असुदे किंवा मग कोणतेही कार्य असुदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा देखील अनेकदा झाली आहे. मात्र नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केलेल्या एका गौप्यास्फोटामुळे चांगलीच खळबळ माजली आहे आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना देखील उधाण आले आहे. भाजप नेतेच पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापत कि नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) भाजपच्या महत्त्वाच्या निर्णयातून आणि एकूणच कामकाजातून डावलण्यात येत असल्याच्या चर्चा गेल्या कितीतरी महिन्यांपासून सुरु आहेत. तसेच यापूर्वी संबंधित प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांचे मत मांडले होते आणि त्यांनी कुणाचेही नाव न घेता याबाबत चांगलीच टीका देखील केली होती. या सगळ्यातच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ठाकरे गटाकडून त्यांच्या पक्षात सामील होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मग पंकजा मुंडे हि ऑफर स्वीकारतील का आणि भाजप पक्ष सोडून ठाकरे गटात सामील होतील का? असा प्रश्न सर्वांचा पडला होता. त्यातच आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या या मोठ्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भाजप पक्षातून पंकजा मुडेंना नक्की कोण बदनाम करण्याचा करतंय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो बीड येथे झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारसभेचा आहे. या प्रचारसभेत पंकजा मुंडे ह्या भाषण करण्यासाठी उठल्या असता त्यांना भाषण करण्यापासून रोखत चंद्रशेखर बावनकुळे स्वतः आधी भाषण करताना दिसत आहेत. तसेच आधी भाषण करण्याची संधी द्यावी अशी विनंती पंकजा मुंडे करत असताना देखील. बावनकुळे हे आधी भाषण करताना दिसत आहेत. यावरच बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला. पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या असून, त्यावर अपमान समजणे हास्यास्पद आहे.”

हे ही वाचा:

SSR Birth Anniversary, सुशांत सिंग राजपूत हा किती वेळ झोपायचा तुम्हाला माहित आहे का ?

‘तो फलंदाजी करतानाही विकेट घेत होता…’ सचिनने माजी गोलंदाजाची उडवली खिल्ली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version