Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Mahavikas Aghadi ला मतं देणे म्हणजे Modi Government ची योजना बंद करणे: Chandrashekhar Bawankule

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ (Maharshtra Budget 2024) काल (शुक्रवार, २८ जून) पार पडला. यावरून राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी जोरदार टीका केली. तर दुसरीकडे महायुतीमधील नेत्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत राज्य सरकारचे अभिनंदन करत आहे. अश्यातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “महाविकास आघाडीला मतं देणे म्हणजे मोदी सरकारची (Modi Government) योजना बंद करणे,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हंटले, “बजेट मधून सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या १०० दिवसांमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी जाणार आणि समाजात समाजाचा हिस्सा म्हणुन काम करणार , ७७८ मंडळात आम्ही जाणार. १४ तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशची चार हजार कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार पूर्ण ताकतीने काम करणार आहे. मोदींच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार आणि महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारचं जनतेला न्याय देऊ शकते. महाविकास आघाडीला मतं देणे म्हणजे मोदी सरकारची योजना बंद करणे. महाविकास आघाडीला मत देणं म्हणेज सगळ्या योजना बंद करणे,” असे ते यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत २०२४- २५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटी रुपयांच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Monsoon Session: आरटीओचे ‘लायसन्स टू किल’, विधानसभेत गाजला अंधेरी RTO च्या लायसन्सचा मुद्दा

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss