spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा Sharad Pawar करत आहेत : Chandrashekhar Bawankule

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारी करत आहे. सत्ताधारी आणि विरोधक विविध प्रश्नांवरून एकमेकांवर सवाल उपस्थित करत आहेत. राज्यातील मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) निर्माण झालेल्या परिस्थितीवरूनही महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेते एकमेकांना कात्रीत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आरक्षण प्रश्नावरून राज्यात दोन समाजात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करत, महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती (Manipur) निर्माण होण्याची चिंता वाटते, असे वक्तव्य केले होते. त्यावर आता भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार करत आहे ते चांगलं नाही,’ असे वक्तव्य केले आहे.

शरद पवार यांनी काल (रविवार, २८ जुलै) एका कार्यक्रमात मणिपुरविषयी भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते. “मणिपूरमध्ये पिढ्यानपिढ्या एकत्र असलेल्या दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरदार पेटवण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार झाले. शेती उध्वस्त करण्यात आली. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारा सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते,” असे ते म्हंटले होते.

यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, “निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे, ते चांगलं नाही. जनता सुज्ञ आहे. वेगळे वेगळे आंदोलन तयार करून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनां थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहित नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलतां शरद पवार म्हणाले, “संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चारचा झाली. मणिपूरमधील विविध जातीचे, भाषांचे लोक दिल्लीला आले होते. त्यांनीं आम्हाला माहिती दिली. मणिपूरमध्ये पिढ्यानपिढ्या एकत्र असलेल्या दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरदार पेटवण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार झाले. शेती उध्वस्त करण्यात आली. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारा सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते. एवढं मोठं संकट राज्यावर आल्यानंतर त्यांना सामोरे जाण्याची राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही.”

ते पुढे म्हणाले, :”मणिपूरमध्ये जे घडलं ते आजूबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात तसाच घडलं. आता महाराष्ट्रातही काही घडते कि काय अशी चिंता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले. त्यांनी समाजाचा विचार केला,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

साहेब… महाराष्ट्रातल्या बहिणींना आता लाडकी बहिण योजनेपेक्षा ‘सुरक्षित बहिण’ योजनेची गरज, MNS चा CM Shinde यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss