Chhagan Bhujbal : स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

आज छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, पारुख अब्दुला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी त्यांच्या संघर्षाचा प्रवास सांगितला.

Chhagan Bhujbal : स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

आज छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, पारुख अब्दुला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी त्यांच्या संघर्षाचा प्रवास सांगितला. लोकं म्हणतात यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. त्यांना सांगायचं आहे की, पहाटे ३ वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो. हळूहळू भाज्या कंपन्यांना विकण्याचं कंत्राट घेतलं होतं. आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर… भुजबळांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

यावेळी आपल्या आयुष्याचा पट उलगडताना छगन भुजबळ काहीसे भावूक झाले. पण लहानपणापासून आपण किती कष्ट केले याचा उलगडा त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर दिला. भुजबळ म्हणाले, आम्ही लहान असताना आम्ही मार्केटला भाजी आणायला जायचो. तिथून भाजी आणायची आणि नंतर माझगावला फुटपाथवर ती विकायचो. पुढे माझा मोठा भाऊ म्हणजे समीर भुजबळांचे वडील त्यांनं खूप कष्ट घेतले. सकाळी तीन वाजता भाऊ भाजी मार्केटला जायचा त्यानंतर पाच वाजता मी जायचो. त्यानंतर हळूहळू आमचा धंदा वाढत गेला, मी शिक्षणही करायचो. आरसीएफ, जॉन्सन अँण्ड जॉन्सन अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांची आम्ही वार्षिक कॉन्ट्रॅक्ट मिळवली. त्यावेळी मलन बंधू नावानं आम्ही ही कॉन्ट्रॅक्ट घेतली त्यानंतर आम्ही दररोज ट्रकलोड भाजी पाठवायचो. पण लोक मला विचारतात की एवढी संपत्ती कुठून आणली? ही संपत्ती कमावण्यासाठी आम्ही लहान पणापासून मेहनत घेतलीए.

त्या काळात दास एम अँड कंपनीचे प्राणलाल खोगीलाल यांच्याकडे भारतातील सर्वात जास्त विंटेज कार होत्या, तीथे मी मॅनेजर होतो. आण्णासाहेब पाटील माझे मित्र त्यांसोबत माथाडी कामगारांचे मी कॉन्ट्रॅक्टही घेतले. अजिवारीमध्ये एक रब्रेक्स नावाची कंपनी बंद पडली होती. या कंपनीचा मालकच सोडून गेला होता. त्यामुळं कामगारांना पगार नाही काही नाही. त्यावेळी कामगार मला म्हणाले, घ्या कंपनी चालवायला आणि आमचा पगार द्या हळूहळू. ही कंपनी मी सुरु केली त्यामध्ये संपूर्ण बीएसटीच्या बस गाड्यांच्या टायर रिमोल्डिंगचं काम माझ्याकडं यायचं. त्यानंतर दुसरी कंपनी पनवेलमध्ये घेतली. रबराचे विविध पार्ट्स बनवणारी ही कंपनी होती. मुंबई आणि गोव्यातील पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स ही छगन भुजबळने सुरु केली. सिनेमाही काढले, असे अनेक उद्योग सुरु होते, तरीही लोक विचारतात कसे आले पैसे कसे आले पैसे? अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या संपत्तीबाबत माहिती दिली.

शिवसेनंच काम सुरु झालं. मराठी माणसासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिसी आम्ही उभं राहिलो. घोषणाबाजी केली. रात्री तीन तीन वाजेपर्यंत घोषणा चुन्यानं लिहायचो. हे करत असातानाच १९७३ मध्ये छगन भुजबळ यांना निवडून द्या असे म्हणत प्रचार केला. एक रुपयाही खर्च न करता मी निवडणूक जिंकली होती. लोकांनी निवडून दिले. असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले, मला मनोहर जोशी यांनी एमसीए निवडणूक लढवायचे सांगितली, अर्ज दाखल केला आणि जोशी गायब झाले. मतदान दिवशी मनोहर जोशी पवार साहेब समवेत होते. शरद पवार यांच्या विरोधात उभे राहिलो, जे मनोहर जोशी यांनी मला पवार यांच्या विरोधात उभे केले तेच जोशी हे पवार यांच्या सोबत होते..पवार यांचे काही सांगता येत नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितलं.

७५ वर्षांचा चित्रपट जेव्हा डोळ्यासमोरुन जातो, तेव्हा विचार करतो… आपण कुठे होतो काय झालो असा विचार केला जातो. त्यावेळी असं लक्षात आलं. जेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं तेव्हा आई आणि वडिल दोघेही गेले. आईच्या मावशीनं माझगावमध्ये माझं आणि भावाचं संगोपण केलं. दहा बाय बाराच्या खोलीत आम्ही लहानाचं मोठं झालो. बीएमसीमधील शिक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं. पुस्तकं वह्या ते द्यायचे. सहलीलाही ते घेऊन जायचे. माझ्यावर सर्व संस्कार त्यांनीच केले. भाषण कसं करायचं हे मी तेव्हाच शिकलो. त्यानंतर एलफिस्टनमध्ये शिकलो…. त्यानंतर नेव्हीमध्ये शिकलो… चांगले मार्क मिळाले होते. त्यानंतर व्हीजेटीआय कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला… तिथेही पहिलेच पारितोषिक मिळाले… हे सर्व करत असताना बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये सभा झाली. त्यावेळी मी कॉलेजमध्ये सेक्रेटरी होते… मराठी माणसाला नोकऱ्या मिळायला हव्या, असे विद्यार्थी म्हणाले. त्यामुळे आम्ही शिवाजी पार्कमध्ये गेलो. त्या सभेला प्रबोधनकार ठाकरे होते, दत्ताजी साळवे होते, बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी आम्हाला पटलं, जायला हवं. त्यानंतर माझगावमध्ये आलो, तेव्हा मला शाखाप्रमुख व्हायला हवं असं सांगण्यात आलं. पहिल्या १० – १२ शाखाप्रमुखांमधील मी एक होय, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

माझी एकसष्टी शिवाजी पार्कमध्ये साजरी झाली होती, तेव्हा शरद पवार तर होतेच, तेव्हा फारुख अब्दुला यांनीही त्यावेळी आशिर्वाद दिले होते. आपण सर्वजणही आला असाल. पण त्यावेळी आलेल्या दोन व्यक्ती आज नाहीत. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख आज नाहीत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केलं होतं, पण व्यस्त कार्यक्रमामुळे ते आले नसतील. पण त्यांच्या शुभेच्छा असतील असं गृहित धरतो. असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा :

Andheri East By Poll Election : ऋतुजा लटकेंच्या मुलाची मोजक्या शब्दात नेमकी प्रतिक्रिया

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

ऋतुजा लटके यांच्या बाजूने लागल्यालानंतर ठाकरे गटातील महिलांच्या प्रतिक्रिया; आम्ही थेट भिडणारे लोक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version