Chhagan Bhujbal: छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Nationalist Congress leader Chhagan Bhujbal) आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

chhagan bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Nationalist Congress leader Chhagan Bhujbal) आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. चेंबूर येथील एका रहिवाशाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर IPC सेक्शन ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शेअर करण्यात आलेल्य व्हिडिओत छगन भुजबळ हिंदू धर्माविरोधात बोलत असून हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

काय म्हणाले होते छगन भुजबळ –

‘शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. महापुरुषांमुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळालं, त्यांची पूजा करायला हवी..यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे’, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. सरस्वती विषयाचं राजकारण का केलं जातंय? मी देखील हिंदूच आहे, असं भुजबळांनी नंतर स्पष्टीकरण दिलं होतं.

हे ही वाचा:

Gujrat Boat in Pakistan Coustody : भारताच्या २ बोटी पाकिस्तानच्या ताब्यात

5G in India : आजपासून इंटरनेट सुस्साट… जाणून घ्या संपूर्ण माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version