spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बारामतीच्या रॅलीत पाऊस खूप पडत होता म्हणून… Sharad Pawar यांच्यावरील टीकेवर Chhagan Bhujbal यांनी सांगितले खरे कारण

राज्यातील आरक्षणप्रश्नावरून सुरु झालेला वाद आता चिघळत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल (सोमवार, १५ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Shatad Pawar) यांची भेट घेतली होती. यावरून बऱ्याच राजकीय चर्चा रंगल्या होत्या. आता छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार, १६ जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बारामती सभेदरम्यान शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा उलघडा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रविवारी (१४ जुलै) जनसन्मान मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आरक्षणप्रश्नी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत बोलताना, “बैठकीला सर्वजण येणार होते पण, बारामतीतून कोणाचातरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला,” असे वक्तव्य करत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

याबाबत आज ते म्हणाले, “बारामतीच्या रॅली मध्ये पाऊस खूप पडत होता. पाऊस थांबल्यामुळे मला बोलण्यासाठी सांगितले. ओबीसी साठी शरद पवार यांनी आरक्षण दिले, त्यामुळे मी म्हणलं तुम्ही त्या बैठकीला का आले नाही? शरद पवार आहेत का घरी याची माहिती घेतली आणि मी गेलो. मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर तिथे होते. मी गेलो तेव्हा शरद पवार झोपले होते, झोपूनच ते माझ्याशी बोलत होते. तुम्ही दिलेला आरक्षण संपेल असे वाटत आहे मी त्याना सांगितले. तुम्ही सगळ्यांशी बोलून हा प्रश्न सोडवायला पाहिजे असं मी त्यांना बोललो. मीच मुख्यमंत्री यांना फोन करून मोजक्या लोकांना बोलवून बैठक घेण्यासाठी सांगणार आहे असे त्यांनी मला सांगितले. मुख्यमंत्र्यांबद्दल मी काही बोललो नाही फक्त शरद पवार यांचे अनुभव जास्त आहे असं म्हणालो,” असे ते म्हणाले.

छगन भुजबल यांनी शरद पवारांवर रविवारी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवरून चांगलेच ताशेरे ओढले होते. याचवेळी त्यांनी भुजबळांवर टिका करत, “भुजबळसाहेब आपणही बाहेर जेवढे विरोधात बोलता; तेवढेच कॅबिनेटमध्ये बोलले असते अन् कॅबिनेट ला निर्णय घ्यायला लावला असता ती आपल्यात क्षमता आहे किंवा मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर लोकांच्या प्रश्नावर लढणारा नेता म्हणून म्हणून आपली ख्याती आहे ती अजुन वृंधिंगत झाली असती. फक्त दोन समाजात तेढ निर्माण होईल, याची हे सरकार व्यवस्था करीत असते. लोकसभेला बसलेल्या फटक्या मुळे आपले सरकार अस्वस्थ आहे आणि उभ्या महाराष्ट्रला ते दिसते आहे,” असे वक्तव्य केले होते.

हे ही वाचा:

VISHALGAD ENCROACHMENT: जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय…Narayan Rane यांची पोस्ट चर्चेत

Sharad Pawar यांच्यावर आरोप करण्याआधी तुम्ही OBC आणि…काय म्हणाले Vinayak Raut?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss