Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Chhagan Bhujbal-छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांची हायकोर्टात धाव

छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी भुजबळांच्या विरोधात आता कोर्टात धाव घेतली आहे. भुजबळांसंबंधित संस्थांच्या गैरव्यवहारांच्या चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. त्याचबरोबर शासनाने फेरविचार करण्याचा जीआर काढण्यात आला होता, त्याच काय झालं असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. एकीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे भाजप सरकारसोबत सत्तेत सामील झाले. यात छगन भुजबळ यांनी देखील अजितदादांसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी विधिमंडळात या चौकशी संदर्भात प्रश्न उपस्थित केली आहे. यावेळी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अशातच अजित दादासोबत छगन भुजबळ मंत्री झाले, त्यानंतर ही चौकशी मागे पडल्याचे अंजली दमानिया यांनी सांगत पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. शिंद-फडणवीस भाजपाचे सरकार देखील यावर कार्यवाही करताना दिसत नाही, त्यामुळे आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर कारवाई थांबली तर नाही ना? असाही प्रश्न आता अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळालेल्या छगन भुजबळ यांच्या पाठीमागे हा ससेमिरा पुन्हा लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मुंबई हायकोर्टातल्या न्यायाधीशांची बदली केलेली होती, तर महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय मंडळाने या संदर्भात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावर कामच झाले नसल्याचा ठपका ठेवत पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केल्याने भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss