Thursday, July 4, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil यांना शिक्षणाची गरज: Chhagan Bhujbal

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात आरक्षणावरून मराठा ओबीसी वादावर जोरदार खडाजंगी चालू आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसींमधून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे इतर ओबीसी नेते यावर विरोध करत असून ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) इतर वाटेकरी नको अशी मागणी करत आहेत. राज्यात आरक्षणप्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच आज (सोमवार, २४ जून) मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले, “भुजबळ तलवार काढण्याची धमकी देत असेल तर जशास तसे उत्तर देणार आहे,” यावर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आपण भाषण करतो तेव्हा अशा उपमा दिल्या जातात. त्याला समजणे शक्य नाही, त्यासाठी थोड शिक्षण महत्वाचं असतं. लोकांना जागृत करण्यासाठी तसे बोलावे लागते. लेकरं बाळ म्हणून भावनिक करायचं.आमच्याकडेही लेकरं बाळ आहेत. बीड मध्ये घरे जाळली.तेव्हा आपलं संरक्षण केलं पाहिजे. अन्याय कोणत्याही समाजावर होत असेल तर सर्वांनी एकत्र जाऊन त्याच रक्षण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ती शिकवण आहे. म्हणून आम्ही शेरो शायरीतून, अभंगातून तशी उदाहरणे देत असतो. नाठाळाच्या माथी हाणू काठी असा अभंग आहे.म्हणून आपण डोक्यात काठी मारत फिरतो का..? पण हे समजायला थोडं तरी शिक्षण लागतं.”

ते पुढे म्हणाले, “तुझे किती ५६ टक्के असू दे किंवा १०० टक्के असू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही कुठे सांगितलं तलवारी काढा.? प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका असे सांगण्यासाठी उदाहरणे दिली जातात. तुझ्याकडे तर पिस्तुलधारी आहेत. तुझ्या आजूबाजूचे कार्यकर्ते शोधले तर अनेक जण सापडतील. वाळू माफिया, अजून काय काय माफिया तुझ्या सोबत आहेत. आम्ही लढतो ते विचारधारेमधून… भाषणातून अनेक उदाहरणे, उपमा देत आम्ही लढतो आहे. चला, उठा, आयुष्याच्या पेटवा मशाली असे उदाहरण दिले म्हणजे कायम मशाली पेटवून ठेवायच्या का? त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे. त्याला काय समजत नसेल, तर त्याने शाळेत जावे. तिथं समजेल की नाही हे देखील महत्वाचे, पण त्यांना शाळेत जाण्याची गरज आहे.”

हे ही वाचा

Chhagan Bhujbal तलवार काढण्याची धमकी देत असेल तर… Manoj Jarange Patil आक्रमक

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss