spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MVA Vajramuth Sabha, हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, अजित पवारांचं भाजपला आव्हान

छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. आज पहिल्यांदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची होत आहे. यावेळी अजित पवार अनेक मुद्दे हे मांडेल आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. आज पहिल्यांदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची होत आहे. यावेळी अजित पवार अनेक मुद्दे हे मांडेल आहेत.

यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी एक आठवण सांगितली आहे. यावेळी बोलत असताना जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले होते की, आपण वेगवेगळ्या भागात त्या त्या पक्षाचे मतदान, तिथला कार्यकर्ता यांच्या साठी एक अश्या प्रकारची सभा घेऊ असं अजित पवार म्हटले आहेत. पुढे ते म्हणाले आहते की, त्या काळात कोरोना होता आणि नंतर अचानक महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवरून अचानक पायावरून झालं. आज पहिल्यादाच छत्रपती संभाजी नगर मध्ये अश्या सभा होणार आहेत. अश्या सर्व सभा राज्याच्या प्रत्येक भागात अश्या प्रकारच्या सभा या घ्यायच्या आहेत असं देखील अजित पवार हे म्हणले आहेत. तसेच सर्वांचं स्वागत देखील अजित पवार यांनी केलं आहे.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले आहेत की, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्यं केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला. हे शक्तीहीन सरकार असल्याचं सर्वोच्च न्यायायलाने म्हटलं. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा अपमान केला. मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमाला केवळ 13 मिनिटे दिली हे चुकीचं आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच अजित पवार म्हणाले आहेत की, सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्यं केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला. हे शक्तीहीन सरकार असल्याचं सर्वोच्च न्यायायलाने म्हटलं. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असंही ते म्हणाले. तसेच अजित पवार पुढे म्हणाले आहेत की, भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss