Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha, सरकार घाबरलंय, म्हणून यात्रा काढतंय, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. आज पहिल्यांदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत धनंजय मुंडे यांनी सरकारने चांगलाच हल्लाबोल केला आहे.

Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha, सरकार घाबरलंय, म्हणून यात्रा काढतंय, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Chhatrapati Sambhaji Nagar Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. आज पहिल्यांदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत धनंजय मुंडे यांनी सरकारने चांगलाच हल्लाबोल केला आहे.

आज वज्रमुठ सभेत बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, आजच्या सभेला सुरुवात कुठून करावी? काल १ एप्रिल झाला. चार दिवसांनंतर ६ एप्रिल आहे. त्या दिवशी भाजपाचा स्थापना दिवस आहे. पण गेल्या १० वर्षांचं देशातलं राजकारण पाहिलं, तर २०१४ पासून ज्या निवडणुका झाल्या, जनतेला खऱ्या अर्थानं कुणी फुल बनवलं असेल, तर ते कमळाच्या फुलानं बनवलंय असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, ज्या दिवशी वज्रमूठची महाराष्ट्रातली शेवटची सभा होईल, त्या दिवशी महाराष्ट्रातील १२ कोटी जनता १ एप्रिल म्हणजे भाजपाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केल्याशिवाय राहणार नाही.तसेच या वज्रमूठ सभेची घोषणा झाल्यानंतर त्याच तारखेला सावरकर गौरव यात्रा निघाली. मला वाटलं, हे ताकद दाखवण्यासाठी यात्रा काढतायत की मविआच्या ताकदीला घाबरून यात्रा काढतायत. मविआच्या वज्रमुठीला सरकार एवढं घाबरलंय, की जिथे वज्रमूठ सभा होईल, तिथे मुख्यमंत्र्यांची यात्रा नक्कीच होईल असं देखील धनंजय मुंडे म्हणाले आहे.

तसेच धनंजय मुंडे पुढे म्हणाले आहेत की, दिल्लीश्वराला गाडायची ताकद मराठवाड्याने दाखवली असल्याचे ते म्हणाले. सभेला घाबरून भाजप शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा सुरु असल्याचे म्हणाले. सरकारला चोर म्हटल्यास कधी सदस्यत्व जाईल याचा नेम नसल्याचे ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी पुढे इंदोरींची एक आठवण सांगितली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणले आहेत की मी राहत इंदोरींची मुलाखत ऐकत होतो. त्यांनी आणीबाणीचा काळ सांगितला. ते म्हणाले त्या काळात मी सरकारला चोर म्हटलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मला ठाण्यात बोलवून चौकशी केली की तुम्ही सरकारला चोर कसं म्हणालात? राहत इंदोरी म्हणाले, मी भारत किंवा पाकिस्तान किंवा अमेरिकेच्या सरकारला चोर म्हटलेलं नाही. मी तर फक्त सरकार चोर आहे असं म्हणालो. पोलीस म्हणाले, इंदौरी साहब, आप हमें इतना बेवकूफ समझते हो, हमें मालूम नहीं कौन सी सरकार चौर है? असं देखी; ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version