उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी…

उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लबोल हा केला आहे. आज भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी सुरिवातीपासूनच भाजपवर निशाणा हा साधला आहे.

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी…

Chhatrapati Sambhaji Nagar Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. आज पहिल्यांदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची होत आहे. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लबोल हा केला आहे. आज भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी सुरिवातीपासूनच भाजपवर निशाणा हा साधला आहे.

आज बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, सध्या अनेक ठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चा काढला जात आहे. पण हिंदूंचा नेता पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, २५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो. भाजपाबरोबर आपली युती होती. दोनदा सरकार आलं. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं का? म्हणून मला अभिमान वाटतो, मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, हल्ली काहींना डॉक्टरेटही मिळते. काहीजण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात. सोडून द्या त्यांना. पण आज अनेक तरुण पदवीधर होतायत. पदवी दाखवूनही एकीकडे किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी मागितली, तर २५ हजार दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कॉलेजलाही हा अभिमान असायला हवा की आमच्या कॉलेजमधला एक व्यक्ती पंतप्रधान झालाय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर देखील निशाणा हा साधला आहे. तसे पुढे ते म्हणले आहेत की, भाजपाचं म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललंय. देशभरातली भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा असं म्हणत चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

Exit mobile version