spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Eknath shinde : शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. शरद पवार सध्या ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल आहेत. आज शिंदे पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहचले आहेत. शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रिचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भेटीसंदर्भात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले की, पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी सर्वांनाच आहे. आम्ही दौऱ्यावर आहे. मात्र आम्ही सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो, असही केसरकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : 

IPL 2023 : २०२३च्या आयपीएल मध्ये रवींद्र जडेजाच्या संघ बदलण्याच्या निर्णयावरून एमएस धोनी म्हणाला…

शरद पवार यांना काल डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांना बर होण्यासाठी आणखी १ ते २ दिवस लागतील अशी सध्याची माहिती आहे. उद्यापासून राष्ट्रवादीचे शिबिर सुरू होणार आहे. या शिबिराला शरद पवार मार्गदर्शन करणार होते. अजूनही त्यांना २ दिवस तरी पूर्णपणे बर होण्यासाठी लागतील त्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे.

शिर्डीत ४ आणि ५ नोव्हेंबरला अभ्यास शिबीर आयोजित केले आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार आणि इतर मान्यवर बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजिक ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. या अभ्यास शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तरीदेखील तेथून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अभ्यास शिबीराला हजेरी लावली.

Sindhudurg : जिल्हा नियोजन सभेदरम्यान नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात शाब्दिक खडाजंगी

Latest Posts

Don't Miss