spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार, खासदाराचं पोलीस महासंचालकांना पत्र

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संरक्षणात कपात करण्यात आली आहे. राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार केला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संरक्षणात कपात करण्यात आली आहे. राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार केला आहे. सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक संरक्षणात कपात केली आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापनेनंतर ठाण्यात नेहमीच काहीना काही कारणावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनसामने आल्याचे पाहायला मिळालं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील पदाधिकारी आणि नेत्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र, आता ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांच्या अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. राजन विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला आहे. कपात केलेले अंगरक्षक पोलीस यांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेठ गेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर वर कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना टोसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिखावणीखोर प्रकार कथाकथीत स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला. अशा उपरोक्त परिस्थीततच माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई,मीरा भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने माला वारंवार रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. त्यामुळेच मला २०१९ च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत ७ लाख ४० हतार ९६९ मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटते.

महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासह कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास हल्ला झाल्यास किंवा माझ्या कुटुंबियांना काही धोका निर्माण झाल्यास त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील. त्यामुळे मला पूर्वी जशी सुरक्षा होती तशाच प्रकारची सुरक्षा पुन्हा देण्यात यावी, अशी मागणी राजन विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

आश्चर्य म्हणजे शिंदे गटातील ज्यांना शासकीय किंवा राजकीय उच्च पद नाहीत अशांनाही पोलीस संरक्षणत देण्यात आलेले आहे. माझे अंकरक्षक कपात केल्यामुळे माझ्या व कुटुंबियांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे. दुर्देवाने अशी काही दुर्घटना झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री वर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील. तरी कृपता माझ्या अंतरक्षक पोलीस संरक्षणता वाढ करावी ही नम्र विनंती. असे राजन विचारे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

अंधेरीत माघारीनंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

राशी भविष्य – १८ ऑक्टोबर २०२२ – कोणतेही वचन देण्याआधी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss