मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब ?

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब ?

Cabinet expansion

मुंबई : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचा शपतविधी होऊन 36 दिवसपूर्ण झाले असूनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही यामुळे, सतत विरोधक कायम राज्य सरकारवर रोष धरून आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली वाऱ्या सुरूच आहे. आजही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकाद दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती चांगली नसल्या कारणाने त्यांचे दिल्लीला जाणे निश्चित नव्हते परंतु समोर आलेल्या माहित नुसार फडणवीस यांच्यासह शिंदे देखील आज दिल्लीत जाणार आहेत.

पुढे दोन दिवस शिंदे आणि फडणवीस दिल्लीत असणार आहेत. दोन दिवसांत दोन सरकारी बैठकांना उपस्थिती हा प्रमुख अजेंडा असला तरी या दौऱ्यात नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं दिसत आहे. भाजपची यादी निश्चित झाली असून दिल्ली दौऱ्यात त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहित समोर येत आहे.

तसेच एकनाथ शिंदे रविवारी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री ‘हर घर तिरंगा’ या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे. त्यासाठी उपस्थित राहणार आहेत, तसेच रविवारी ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. या दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत, तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा सुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

लवकरच, लवकरच, लवकरच… म्हणत अजित पवारांचा मंत्रिमंडळाबाबत राज्य सरकारवर निशाणा

Exit mobile version