spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

साखर उद्योगासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर केली चर्चा

काल मुख्यामंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra fadnavis) हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळेस साखर उद्योगासंदर्भात दोन्ही नेत्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली. या वेळेस एक बैठक घेण्यात आली होती. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये साखर उद्योगासमोरअसणाऱ्या अडचणी आणि या उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भातील बाबींवर चर्चा करण्यात आली. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे की “यावर पुढच्या आठवडाभरातच सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे.

मंगळवारी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भात सहकारी मंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा केली आहे. या संदर्भातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. शिंदे यांनी असे सांगितले आहे की “यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे या दृष्टीकोनातून अमित शाह यांच्यासोबत ही बैठक झाली होती. या बैठकीला केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्माजी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजामुंडे, खासादर रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार सुजय विखे, खासादर धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.”असे एकनाथ शिंदे यांनी सांगितल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माहिती दिली आहे की “साखर उद्योगांचे खेळते भांडवल, कर्ज पुनर्रचना, आयकराचे विषय, को-जनरेशन इत्यादी अनेक विषयांवर आणि एकूणच साखर उद्योगांच्या अडचणी आणि उद्योगाचे सशक्तीकरण यावर चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल आहे. तसेच “या सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन सहकारमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.” असाही देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितल.

हे ही वाचा:

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?, अतुल लोंढे

सदावर्तेंनी केला मोठा दावा, “फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss