Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज रात्री दिल्ली दौऱ्यावर, खातेवाटपावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी रात्री दिल्‍लीला जाणार आहेत. मावळते राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्‍या कार्यक्रमाला उपस्‍थित राहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जात असले तरी मंत्रीमंडळ विस्‍ताराच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या दिल्‍ली भेटीला महत्‍व आले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज अधिकृत दिल्‍ली दौरा आहे. विशेष म्‍हणजे फडणवीस यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. मावळते राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ दिल्‍लीत स्‍नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशातील सर्व राज्‍यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आहे. त्‍यासाठी शिंदे, फडणवीस दिल्‍लीला जात आहेत.

हेही वाचा : 

आ. सुहास कांदेंच्या विरुद्ध पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आक्रमक

आज दिल्ली दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्री पदाच्या विस्ताराबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात दोन टप्प्यांमध्ये मंत्रीपद पदाचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु देशाचे नवे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेतला जाईल.

राज ठाकरेंच्या सुपुत्राने केला दादर ते अंबरनाथ लोकल ट्रेन मधून प्रवास

Latest Posts

Don't Miss