दिल्लीत घुमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवाज, राज्यप्रमुखांच्या मेळाव्याला शिंदे संबोधणार

आपली राज्याबाहेरील ताकद दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत राज्यप्रमुखांसोबत मेळावा घेत आहेत.

दिल्लीत घुमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवाज,  राज्यप्रमुखांच्या मेळाव्याला शिंदे संबोधणार

आज मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले असताना दुसरीकडे आपली राज्याबाहेरील ताकद दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत राज्यप्रमुखांसोबत मेळावा घेत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला देखील संबोधित करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या या सभेसाठी देशाच्या विविध भागातून राज्यप्रमुखांनी हजेरी लावली आहे. विविध राज्यातील राज्यप्रमुखांमुळे दिल्लीतील महाराष्ट्रसदन गजबजलं आहे.

एकनाथ शिंदे हे या सभेत राज्यप्रमुखांना संबोधित करताना म्हणाले, आजचा दिवस हा शिवसेनेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे.

आज मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले असताना दुसरीकडे आपली राज्याबाहेरील ताकद दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत राज्यप्रमुखांसोबत मेळावा घेत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला देखील संबोधित करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या या सभेसाठी देशाच्या विविध भागातून राज्यप्रमुखांनी हजेरी लावली आहे. विविध राज्यातील राज्यप्रमुखांमुळे दिल्लीतील महाराष्ट्रसदन गजबजलं आहे.

शिवसेना आणि शिंदेगटातील दसरा मेळावा वाद विकोपाला जात असताना एकनाथ शिंदेंनी ही सभा संबोधित करत आहेत. एकनाथ शिंदे हे या सभेत राज्यप्रमुखांना संबोधित करताना म्हणाले, आजचा दिवस हा शिवसेनेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे नेणारे कार्यकर्ते आहोत. शिंदेगटातील ४० ते ५० नेत्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले आहे. आमचा हा संघर्ष, हा सत्तात्याग संपूर्ण जगाने, संपूर्ण देशाने पहिला आहे. आम्ही सत्तेत असलेल्या पक्षाचा आणि सत्तेचा त्याग केला. तेव्हा मनात सत्तेची किंवा मुख्यमंत्री पदाची हाव नव्हती. तसेच महाविकास आघाडीला टोला लगावत एकनाथ शिंदे म्हणाले, की एकेकाळी बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले शत्रू आहेत, त्यांना कधीच जवळ करू नये आणि जेव्हा त्यांना जवळ करायची वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन.”

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडून, काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यावेळी देखील अनेकांचा याला विरोध होता. पण, आम्ही, शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या परंपरेमुळे वरिष्ठ नेत्याचे आदेश मानले. पण, सत्ता आमची असताना, मुख्यमंत्री आमचा असताना शिवसेनेचे लोक आता जात होते. आमच्यावर अन्याय होत होते. पण , हाच अन्याय असह्य झाला आणि आम्हाला संघर्ष करावा लागला आणि आता लोकांनीही आमचा स्वीकार केला आहे. आम्ही ही जी भूमिका घेतलीय ती बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी पुढे नेण्यासाठी घेतली आहे. बाळासाहेबांनी सत्तेसाठी तत्वांशी कधीच प्रतारणा केली नाही. वेळप्रसंगी त्यांनी सत्तेला देखील तत्वांसाठी धुडकावून लावले आहे.

त्यांच्या हैद्राबाद दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, मी तिथे गेलो असताना खुप लोक मला भेटायला आणि त्यांनी मला सांगितले मी जे काही केलं ते योग्य केले आहे.

तसेच लोकांना आश्वासन देत ते म्हणाले आम्ही बाळासाहेब ठाकरेच्या विचारांशी आम्ही प्रतारणा करणार नाही आणि ह्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलाय त्यांची फसवणूक आम्ही करणार नाही. संपूर्ण देशभरात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही पुढे नेणार आणि सर्व राज्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा आणि त्यांच्यासाठी संघर्ष करण्याचे काम तिथले राज्यप्रमुख आणि शिवसेना करतील.

उद्धव ठाकरेंवर टीका करत शिंदे म्हणाले, पार्टी कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. जेव्हा तुम्ही पार्टीच्या कार्यकर्त्यांना नोकर समजलं तेव्हा ते कुणीच सहन करणार नाही. कारण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून पक्ष तयार केला आहे. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये, बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही आहोत. त्यामुळेच आम्हाला समर्थन मिळत आहे. म्हणूनच तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत ६व्या नंबरवर घसरलात आणि आम्ही पुढे चाललोय. निवडणुका तर होत असतात पण त्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार तुमच्या पद्धतीने नाही वळवू शकत.

अडीच वर्षांनी ठाकरेंना गटप्रमुख आठवले…

आधी पक्षातील कार्यकर्त्यांना फोन येत नव्हते पण, नेते आणि कार्यकर्ते मला येऊन भेटल्यावर त्यांना दहा दहा वीस वीस वेळा फोन येऊ लागले. कार्यकर्त्यांना नोकरांसारखे वागवल्यास कुणीही तुमच्या सोबत राहणार नाही. आमच्यामुळे कार्यकर्त्यांचे अच्छे दिन आले आहेत, अडीच वर्षांनी गटप्रमुखांनची आठवण उद्धव ठाकरेंना झाल्याचही ते म्हणाले.

ये पब्लिक है ये सब जानती है

आम्ही शिवसेनेच्या युतीला पुढे नेले आहे. सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. गद्दार आम्ही नाही, गद्दारी आमच्या रक्तात नाहीये जनतेला गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे माहीत आहे. ये पब्लिक है ये सब जानती है, अशी खोचक टीका देखील एकनाथ शिंदेंनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या चुकीमुळे लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर कुणाला तरी रोजगार मिळाला का? असा सवाल देखील त्यांनी केला.

मी द्यायचं काम करतो आणि काही जण फक्त घेण्याचं काम करतात त्यामुळे मी आज इथे पोहोचलोय. माझ्या कामामुळे नरेंद्र मोदीजी, अमित शाहजी , देवेंद्र फडणवीस आणि जनतेने मला मुख्यमंत्री पदावर बसवलय.

ते खोके म्हणतात, पण वेळ आल्यावर मीच एक एक खोके उघडणार आहे. कारण माझ्याशिवाय जास्त कुणाला हिशोब माहिती असणार. हे लोक आम्हाला मिंदे म्हणतात पण आम्ही मिंदे नाही बाळासाहेबांचे खंदे आहोत.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना “तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात”, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली. तसेच लोकांच्या हितासाठी ४०० – ५०० निर्णय घेतले, म्हणून लोक टीका करतायत. म्हणून जर मला कत्रती मुखमत्री मंत असतील तर मी आहे. मी राज्याला पुढे नेण्याचे काँट्रॅक्ट घेतले आहे.

मला नरेंद्र मोदी आणि अमित शाहच हस्तक म्हटल जात पण मल त्याचा अभिमान आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी घरी बसणारा नेता नाही मी लोकांमध्ये उतरून काम करतो. असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला

आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आरमदर्ष घेऊन पुढे जातोय. आता तर तुम्ही सत्तेसाठी हिंदुहृदसम्राट म्हणायलाही करचार्तय पण मी नागपूर – मुंबई महामार्गाच्या नाव बदलून हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे अस ठेवलंय.

तसेच त्यांनी लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि पुढे असण्याचे आवाहन केले आणि लोकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असंही ते यावेळी म्हणाले.

 

हे ही वाचा:

शिवसेनेच्या मेळाव्यात राऊतांसाठी खुर्ची आरक्षित

‘आम्हाला न्याय हवा’, पंजाबमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा करण्यात आला निषेध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version