गणपतीला बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले गिरगाव चौपाटीवर

बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहेत.

गणपतीला बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले गिरगाव चौपाटीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर येणार आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता विसर्जनासंबंधी तयारी आणि मिरवणुकिंची सुव्यवस्था पाहण्यासाठी ते आज गिरगाव चौपाटीवर येणार होते. तर सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौपाटीवर पोहोचलेले आहेत. दरवर्षी गिरगावात मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी लोक येतात. अनेक भाविकांची अलोट गर्दी इथे लोटते. त्यामुळे आजच्या या उत्साहात सामील होण्यासाठी आणि बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहेत.

गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी लोक प्रमाणात गर्दी करतात. तसेच आता मोठमोठ्या गणेश मूर्तींचे चौपाटीवर आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी विसर्जनासंबंधी सुव्यवस्था पाहण्यासाठी सरकारी अधिकारी चौपाटीवर उपस्थित असतात. कोरोनानंतर तब्बल २ वर्षांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे या उत्साहात सामील होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौपाटीवर पोहोचले आहेत. सर्वच ठिकाणी जरी गणपतीचे विसर्जन होत असले तरी गिरगाव चौपाटीवर सगळ्यांचं जरा जास्त लक्ष असत कारण, मुंबईतील लालबागच्या राजासारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध गणपतींचे विसर्जन येथे होत असते. त्यामुळे सध्या गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित गोष्ट किंवा प्रकार घडू नये याची काळजी घेतली जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहेत. तेही या गणपती विर्सजनाच्या सोहळ्याचा भाग होण्यासाठी आणि चौपाटीवरील सुव्यवस्था पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचले आहेत. येथे पोहोचताच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात त्यांचे गिरगाव चौपाटीवर आगमन झाले आहे. मुंबई महानगर पालिकेने बांधलेल्या मंडपातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गणपतींचे दर्शन घेत आहेत.

गणेशोत्सवा दरम्यान अनेक मान्यवर गिरगाव चौपाटीला भेट देत असतात. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील गिरगाव चौपाटीवर उपस्थित झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्याचे देखील पुष्पगुच्छ देऊन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल देखील यावेळी उपस्थित होते.

ऐन विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे असणारे दिग्गज आज एकेठिकाणी आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांशी संवाद साधणार का? राजकारणाच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा ते आज करणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सर्वत्र विसर्जनाचा जल्लोष मात्र अपघाताच्या घटनांमुळे लागतंय विसर्जनाला गालबोट

हनी सिंगने पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला, पोटगी म्हणून ही मोठी रक्कम दिली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version