आ. संतोष बांगर यांच्या वर्तणुकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वैतागले

आ. संतोष बांगर यांच्या वर्तणुकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वैतागले

आपल्या आक्रमक भूमिकेमुळे कायमच चर्चेत असणारे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. तसेच त्यांनी कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत शिवराळ भाषेत झापलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आता मुख्यमंत्री (आणि उपमुख्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बांगर यांना झापलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फूट?

बांगर नेहमीच कायदा हातात घेणारी कृत्य करत असताता यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे तसेच कार्यालय फोडल्यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी समज दिली आहे.

हेही वाचा : 

कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातून बोगदा करण्यात यावा; उद्धव ठाकरे गटाकडून रास्ता रोको आंदोलन

“आपण सरकार मध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा. मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमानुसार करुन घ्या तसेच विरोधकांना टिकेची संधी देऊ नका, आपण सरकार मध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा. मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमा नुसार करुन घ्या, विरोधकांना टिकेची संधी देऊ नका”, असा सल्लाही मुख्यमंत्र्यानी त्यांना दिल्याचे समजते.

काय म्हणाले होते संतोष बांगर?

“पीडित शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून येथे कार्यालयात येऊन बसले आहेत. तरीही अधिकाऱ्यांचा थांगपत्ता नाही. तुमच्या बापाची पेंड आहे का? तुम्ही कितीही वाजता येता, तुमची प्रतीक्षा करायला आम्ही तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतरच तुम्हाला समजेल… आजच्या आज हा निर्णय झाला पाहिजे आणि संबंधित कंपनी बॅन झाली पाहिजे, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना झापलं होतं.

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ९६ टक्के मतदान

Exit mobile version