Eknath Shinde Live : ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना

Eknath Shinde Live : ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळ्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले.

प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसमोर नतमस्तक होते. जनतेला सलाम ठोकला. आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्याप्रमाणात जनसंख्य लोटला आहे. हे शिवसैनिक काल रात्रीपासून या ठिकाणी हजेरी लावून आहे. राज्यभरातून आज प्रतिसाद मिळतोय. शेवटचा माणूसही दिसत नाहीय. आज खरा महासागर इथ दिसून येतोय. खरी शिवसेना कुठे याचं उत्तर आज या महासागराने दिलं आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवतीर्थ मिळवलं पण मी या मैदानात हस्तक्षेप केला नाही. मैदानही आम्हाला मिळालं असत. कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे.

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना जपण्यासाठी बाहेर पडलो आहोत. बाळसाहेबांचे विचार जपण्यासाठी आम्ही ही जाहीर भूमिका घेतली. तुम्ही शिवसेनेचा रिमोट राष्ट्रवादीच्या हाती दिला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचायला लागला आणि आम्हालाही नाचायला लावलात ते आम्हाला सहन नाही झालं म्हणून आम्ही बाहेर पडलो. लपून बाहेर पडलो नाहीत. आम्ही खरे शिवसैनिक आहोत.

आमची गद्दारी नाही गदार आहे. गदार म्हणजे क्रांती आम्हाला तुम्ही गद्दार म्हणता पण आम्ही गद्दार नाही तर आम्ही गदार आहोत आम्ही क्रांती केली आहे. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता मग आम्ही तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही सामान्य जनतेशी गद्दारी केली, आम्ही नाही.
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्त्वाचं आहे, आपण सगळे बाळासाहेबांचे निष्ठावंत भक्त आहोत. त्यांचे खरे वारसदार विचारांचे वारसदार वारसा हा कायम विचारांचा असतो तो जपायचा असतो. आम्ही विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.
शिवसेना देशभक्त आणि राष्ट्रभक्ती करणारी आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांना सोडणार नाही. देशविरोधी घोषणा दिल्या तर त्या खपवून घेतली जाणार नाही. देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या लोकांना सोडणार नाही. देशाच्या विरोधी कारवाया खपवून घेणार आहे. आणि यांना या गोष्टीवर बोलवत नाही हे कसले विचार आहेत यांचे. पीएफआय वर बंदी घातल्यावर काही लोक आरएसएस वर बंदी घाला अशी मागणी करतात ही कोणत्या आणि कसल्या विचारांची माणसं आहेत त्यांना मनाची नाही तर जणाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. हे नक्कीच देशासह दुर्दैव ठरेल.
बाळसाहेबांची अपुरी स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची तुम्ही टिंगल करत आलात, तुम्हाला तर मोदींचा अभिमान वाटला पाहिजे, मी इंदिरा गांधींचा पण आदर करत होतो. पण मोदीमुळे या देशाचं नाव जगभर पसरलंय. जेव्हा बाहेरच्या लोकांवर संकट येतं त्यावेळी आपल्या देशातून मदत जाते.जे बाळासाहेबांचे स्वप्न होतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरमधले कलम ३७० हटवतो ते स्वप्न पूर्ण झालं आणि तुम्ही त्यांची टिंगल करता याची तुम्हाला लाज वाटली आहे.
बाळासाहेबांचे खरे वारसदार होणं म्हणजे विचारांचे वारसदार होणे, आम्ही तो जपला आहे. आम्हाला गद्दार म्हटलं जातं. याशिवाय दुसरं काही बोलायला नाही. गद्दारी झाली पण ती २०१९ ला झाली. त्या निवडणूका झाल्या त्यानंतर जी आघाडी झाली त्यात गद्दारी झाली. हिंदूत्वाच्या विचारांसोबत गद्दारी झाली.
मी स्वत: हून ग्रामीण भागातील आमदारांना भेटत होतो, बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत देत होती. हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही. तुमचा कारभार जनतेला आवडला नाही. कोरोनाच्या नावाखाली तुम्ही सगळं बंद केलं परंतु, तुमचं सर्व सुरू होतं, लगावलामी स्वत: हून ग्रामीण भागातील आमदारांना भेटत होतो, बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत देत होती हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही. तुमचा कारभार जनतेला आवडला नाही. कोरोनाच्या नावाखाली तुम्ही सगळं बंद केलं परंतु, तुमचं सर्व सुरू होतं, तुमची दुकान तुम्ही चालू ठेवली. मात्र जनतेला अंधारात ठेवला.
मी सांगतो हा शिवसैनिक नोकर नाही यानेच शिवसेना मोठी केली आहे. याच भान असूदेत. दाऊद आणि याकूबचा हस्तक होण्यापेक्षा मोदी शाहांचा हस्त होणे चांगले. आणि या देशात जेजे नेतृत्व करतात त्यांच्या सोबत आम्ही आहोत निवडणुका आल्या की मराठी माणूस. पण आता मराठी माणूस फसणार नाही. कारण जेव्हा मी फिरत होतो तेव्हा मला लोकं सांगत होते, त्या लोकांच्या हिताचं काम मी आता करेल. नव्या मुंबईच्या विमानतळाला नाव तुम्हीच मला सांगितलं, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिल. सगळ्यात तुम्ही मागे आलात पण आम्ही होणाऱ्या परिणामांची चिंता करत नाही आम्ही जनतेला न्याय मिळवून द्यायच काम करू आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. अन्याय करून आम्हाला कोणालाही पक्षात घ्यायच नाही.
अरुणाताई गडकरी यांनी मला फोन केला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा. त्यांनी मला सांगितलं, दिघे साहेब बोलायचे एकदा तर मी ठाण्याचा मुख्यमंत्री करणार. त्यांना माहित होता तुम्ही कापायला निघालात, आणि त्यांचेही पाय कापलेत, आणि दिघे साहेब गेले तेव्हा तुम्ही मला बोलवलं आणि काय विचारात? आनंद दिघे साहेबांची संपत्ती कुठे किती आहे. आणि कुठे कुठे आहे,पण दिघे साहेबांचे साध एक खाते देखील नव्हते.
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची… ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आणि तुम्हा तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करुन शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं आहे.
Exit mobile version