Dasara Melava : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगमंचावर उपस्थित,भाषणातून कोणच्या दिशेने बाण सोडणार?

Dasara Melava : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगमंचावर उपस्थित,भाषणातून कोणच्या दिशेने बाण सोडणार?

बहुप्रतीक्षित असलेला राज्यातील शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा काहीच क्षणात सुरु होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे यांच्या गटाचाही दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून ३ लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय. यासाठी बस ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत. आता दोन्ही गटांच्या मेळाव्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे.राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे. बीकेसी मैदानावर सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

शहाजीबापू पाटील

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. भाषणाला सुरवात करताचशहाजीबापू पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. तर शरद पवार यांच्यावरतीही टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानात दाखल 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानात दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची सुरवात शहाजीबापू पाटील यांच्या भाषणाने झाली आहे.

भावना गवळी 

आज बापू मला आज शांत वाटले. तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा आहे. तुमच्या सारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राच्या जनतेला गरज आहे. आमदारांनी आणि खासदारांनी काय चुकीचं केलं. आमच्यावर जेव्हा संकट तुटून पडली होती तेव्हा कुठे होता तुम्ही?,आम्ही बाळासाहेबांच्या विचार आमच्यात रक्तात घेऊन पुढे जात आहोत. जेव्हा महाराजांचे मावळे लढाईला जायचे रक्त बंबाळ व्हायचे तेव्हा महाराज जातीने मावळ्यांची विचारपूस करायचे. ते आम्ही याआधी कधीच अनुभवले नाही. म्हणून आम्ही आता बाळासाहेबांच्या विचारची मशाल घेऊन जात आहोत.

शरद पोंक्षे 

बाळासाहेब यांनी एक स्वप्न पाहिलं ते म्हणाले माझा मुख्यमंत्री होईल तेव्हा मी मशिदीवरचे भोंगे काढीन, औरंगाबादच नाव संभाजीनगर करेन ते उद्धव ठाकरे यांनी केलं नाही पण माननीय मुख्यमंत्री यांनी ते करून दाखवलं असं शरद पोंक्षे यांनी म्हंटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगमंचावर उपस्थित

सर्व प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शस्त्र पूजन केलं जात आहे. प्रमुख नेत्याकडून एकनाथ शिंदे यांना चांदीची ढाल देण्यात आली. त्याच बरोबर प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या तलवारीची नोंद करण्यात आली आहे. या तलवारीचं पूजन करून शिंदे गटाच्या मेळाव्याला सुरवात झाली आहे.

जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र जयदेव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे हे माझे पूर्वीपासून आवडीचे आहेत. त्यांनी एक दोन भूमिका ज्या घेतल्या त्या मला खूप आवडल्या. धडाडीच्या नेतृत्वाची गरज आहे. या एकनाथाला ठेवू नका. जे काही चालू आहे ते बरखास्त करा आणि आता शिंदे राज्य येऊदे.

गुलाबराव पाटील

आम्ही कधी दसरा कधी आमच्या घरी केला नाही. कायम आमचा दसरा हा मुंबईत साजरा केला. आणि ते म्हणतात शिवसेनेसाठी काय केलं?, शिवसेनेसाठी आम्ही किती केस अंगावर घेतल्या याची मोजणी होऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जावा हाच आता आमचा निश्चय आहे. हि गर्दी जी जमली आहे ती खरी शिवसेना आहे. आणि ते बोलतात पन्नास खोके दिले. एक वेळ आम्ही उद्धव ठाकरेंचे सहन करू शकतो, पण आदित्य ठाकरे काय बोलतात?, आम्ही जेव्हा पासून शिवसेनेसाठी घाम गाळलं तेव्हा त्यांचा जन्म पण झालं नव्हता. तुमचं नाव कॉँग्रेसच्या यादीत असेल. आम्ही बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यांना आम्ही करोना काळात मुलाला बाहेर फिरवा पण त्यांनी ऐकलं नाही, ये पिल्लू टिल्लू असं केलं. आम्हाला सामूहिक विचारांचा आणि निर्णय घेणारा मुख्यमंत्री हवा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे व बाळासाहेबांचा नातू निहार ठाकरे यांना मंचावर बोलवावे.

रामदास कदम

राष्ट्रवादीचा ध्येय होता शिवसेनेला संपावचे, अजित पवार मंत्रालयात बसून पैसे मोजत होते. राष्ट्रवादीच्या माजी मंत्रांना निवडून द्यायचं आणि शिवसेनेला बरखास्त करायचे हे राष्ट्रवादीचे विचार होते. तर उद्धव साहेब नेमकं कोण गद्दार? गद्दाराच्या व्याख्या काय?

Exit mobile version