spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ जून ला कोल्हापूर दौऱ्यावर

शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात उद्या १३ जूनला होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात उद्या १३ जूनला होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी हा कार्यक्रम राज्य सरकारकडून घेतला जात आहे. हा कार्यक्रम कळंब्यातील तपोवन मैदानात होत आहे. यासाठी तपोवन मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला असून उद्या सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तपोवन मैदानात या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. साई मंदिर कळंबा, संभाजीनगर येथून सर्वांना प्रवेश बंद केला जाणार आहे.

पोवन मैदानात या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भुदरगडकडून कोल्हापूर शहरात येणारी सर्व अवजड व छोट्या वाहनांनी साई मंदिर कळंब्यातून डावीकडे वळण घेऊन चित्रा बाजार मार्गे क्रशर चौक, रंकाळा टॉवर, गंगावेश, छत्रपती शिवाजी पूल या मार्गावरून वळवली जाणार आहेत. तसेच राधानगरीकडून नवीन वाशी नाका मार्गे येणारी सर्व वाहतूक क्रशर चौक, रंकाळा टाॅवर, गंगावेश, छत्रपती शिवाजी पूल या मार्गाने वळवली आहे. तर रत्नागिरी रोड वरून येणाऱ्या वाहनांना वडणगे फाट्याजवळ अडवून ही वाहतूक वडणगे, शिये, भूये आदी मार्गाने वळवण्यात येईल. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कळंबा भाजी मंडई, कळंबा साई मंदिर ते चिवा बाजार रोडच्या दोन्ही बाजूस, तपोवन मैदान पार्किंग, संभाजीनगर डेपो, निर्माण चौक, क्रीडा संकूल एनसीसी ऑफिस या ठिकाणी एसटी बसेससाठी पार्किंग असेल.

दरम्यान, कळंबा जेल क्वार्टरमागील बाजू, कळंबा कारागृह दक्षिण बाजू, कलानिकेतन विद्यालय, तपोवन मैदान पश्चिम बाजू, संभाजीनगर बसस्थानक, आयसोलेशन हॉस्पिटल आणि आयटीआय याठिकाणी दुचाकींसाठी पार्किंग असेल. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरमध्ये उद्या ‘शासन आपले दारी ‘हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रम ठिकाणी आणण्यासाठी बसेसची मदत घेतली जात आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील जवळ्पास १० डेपोतून १०० बसेस कोल्हापूरला जात आहेत. सांगली आगारातून आजच १०० बसेस कोल्हापूरला होणार रवाना होणार आहेत. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगांव, विटा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा, पलूस या आगारातून बसेस कोल्हापूरला जात आहेत.

हे ही वाचा:

कागलमधील कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ झाले दंग

Exclusive INTERVIEW : नारायण राणेंचे कर्तृत्व उध्दव ठाकरे पण मान्य करतील- संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss