गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जाणे औपचारिकता की, मनपासाठी नवीन समीकरण?

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जाणे औपचारिकता की, मनपासाठी नवीन समीकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी साडेचार च्या सुमारास एकनाथ शिंदे हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थनिवासस्थानी पोहोचणार आहेत. काल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणपती बापाच्या दर्शनानिमित्त राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यापूर्वी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण राजकीय परिस्थिती ही अस्थिर झाली आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेसाठी मनसे भाजप युती संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थला भेट दिली तर ही भेट फक्त गणपती दर्शनापूर्ती मर्यादित असेल की त्यात काही नवीन राजकीय समीकरणे दडली आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा : 

डॉन दाऊदची माहिती देणाऱ्याला एनआयए कडून मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेटणार आहे. मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या निवास्थानी जात आहेत. त्याआधी भाजप नेत्यांचे शिवतीर्थावर जाणं येणं सुरूच आहे. त्यामुळे या नेते मंडळींमध्ये नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा होत असेल याचे तपशील अद्यापही समोर आले नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणात जुळतात का? याबद्दल शंका निर्माण होत आहे.

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांची मेळघाटात हवा

शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे आणि भाजप युती होणार अशी राज्यात चर्चा होऊ लागली आहे. याला जास्तीचं खतपाणी मिळाले ते म्हणजे मनसेने भाजपला राज्यसभा, विधान परिषद आणि शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना पूरक भूमिका मिळतात हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची चांगले जवळीक वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि मनसे अंतर्गात काही शिजत  आहे का? हे पाहायला मिळेल.

आज लाँच होणार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्धची पहिली भारतीय लस

Exit mobile version